लोकमान्य टिळकांविषयीच्या पुस्तकावर अघोषित बंदी लोकमान्य टिळक यांच्याविषयीच्या 'फाऊंडेशन्स ऑफ तिलक्स नॅशनॅलिझम-
डिस्क्रिमिनेशन, एज्युकेशन अँड हिंदूुत्व' या डॉ. परिमला राव यांच्या
पुस्तकावर गेल्या सहा-सात महिन्यांपासून महाराष्ट्रात अघोषित बंदी आली आहे.
ओरिएंट ब्लॅक स्वान या प्रकाशन संस्थेने २०१० मध्ये प्रकाशित केलेल्या या
पुस्तकाच्या प्रती बाजारातून काढून घेतल्या असल्याचे सांगण्यात येते.
कोणत्याही व्यक्ती वा संघटनेने थेट मागणी केली नसतानाही केवळ वादभयाने
लादून घेण्यात आलेल्या या बंदीमुळे राज्यातील आविष्कार स्वातंत्र्याबाबतच
प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
डॉ. राव यांचे हे पुस्तक २०१० सालातील असून, ते ओरिएंट ब्लॅक स्वान या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केले आहे. गेल्या वर्षांपर्यंत उपलब्ध असलेले हे पुस्तक अचानक महाराष्ट्रातून गायब झाले आहे. गुजरात, चेन्नई, दिल्ली, नोएडा या शहरांत मात्र ते मिळते. शिवाय ऑनलाइन विक्री करणाऱ्या संकेतस्थळांवरूनही त्याची विक्री सुरू आहे.
पुस्तकाच्या लेखिका डॉ. परिमला राव या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागात सहायक प्राध्यापक आहेत. त्यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता, 'महाराष्ट्रात या पुस्तकावर बंदी आली आहे याबाबत मला काही माहीत नाही,' असे त्या म्हणाल्या. प्रकाशन संस्थेच्या मुंबई कार्यालयातील प्रतिनिधीच्या म्हणण्यानुसार मात्र, 'या पुस्तकावर देशातच बंदी आलेली आहे.'
यापूर्वीही पुस्तकांवर बंदी
*'ओरिएंट ब्लॅक स्वान' या प्रकाशन संस्थेने एप्रिल २०१४ मध्ये प्रकाशित केलेल्या डॉ. मेघा कुमार लिखित 'कम्युनॅलिझम अँड सेक्सुअल व्हायोलन्स - अहमदाबाद सिन्स १९६९' या पुस्तकाच्या ऑनलाइन विक्रीवर शिक्षा बचाव आंदोलनच्या दीनानाथ बात्रा यांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी प्रकाशकाला नोटीस पाठवल्यावर संस्थेने हे पुस्तक बाजारातून मागे घेऊन त्याची विक्री थांबवली. नंतर प्रकाशकाने लेखिकेला पुस्तकातील काही भागाचे पुनर्लेखन करण्यास सांगितले.
*याच संस्थेकडून 'फ्रॉम प्लासी टू पार्टिशन - अ हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया' या शेखर बंदोपाध्याय यांच्या पुस्तकाविषयीही बात्रा यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
*याच बात्रा यांनी न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यामुळे पेंग्विनसारख्या प्रतिष्ठित प्रकाशन संस्थेने विख्यात लेखिका वेंडी डोनिंजर लिखित 'द हिंदूज - अॅन अल्टर्नेटिव्ह हिस्ट्री' या पुस्तकाच्या प्रती नष्ट करण्याचा निर्णय घेतला होता.

aho, Kadusaheb, itaranni lihilela majkur swatachya Blogvar taknyaaadhi tyachi parvangi ghyaychi asate. Aani jyacha to majkur aahe tyacha n chukta ullekh karaycha asato, itate sadhe saujanya tumhala dakhavta yet nahi ka? Hee batmi me Loksatta madhye mazya navane lihili aahe. Tevha mazya navacha ullekh tvarit karava. anyatha ha majkur tumchya Blogvarun kadhun takava. anyatha mala copryright kaydyacha aadhar ghyava lagel.
उत्तर द्याहटवा