काळ असा सूड उगवतो. आपकी अदालत मध्ये मोदीजींनी दहशतवादी हल्ल्यानंतर प्रणव मुखर्जी कसे रडत रडत ओबामांकडे जातात व आम्हाला वाचावा असा टाहो फोडतात, याची नक्कल करून दाखविली होती. या प्रसंगाचा व्हिडीओ सार्वत्रिक झाला होता. तेच प्रणव मुखर्जी नंतर मात्र देशाचे राष्ट्रपती झाले. एव्हढेच नव्हे तर यावर्षी ते भारत रत्नही झाले. काळ एखाद्यावर असाही सूड उगवतो.