बुधवार, २७ मे, २०२०

सत्ताधाऱ्यांना जनतेपासून लांब रहावे असे वाटते काय?
भारताचा नकाशा पहिला तर असे दिसते की बहुतेक राज्यांच्या राजधान्या राज्याच्या एका टोकाला आहेत. उदा, मुंबई, चेन्नई वगैरे. भारताची राजधानीसुद्धा देशाच्या एका टोकाला आहे. दुसरीकडे जगाचा नकाशा पहिला तर बहुतेक दशांच्या राजधान्या त्या त्या देशाच्या एका टोकाला आहेत. याचे कारण हेच समजावे काय की सत्ताधाऱ्यांना जनतेपासून लांब रहावे असे वाटते काय?
ऑस्कर शिंडलर या व्यक्तीच्या जीवनावर 'ज्युरॅसिस पार्क' फेम दिगदर्शक स्टीव्हन स्पीलबर्ग यांनी १९९३ साली चित्रपट तयार केला होता . त्याला ७ ऑस्कर अवॉर्ड मिळाले आहेत. २ कोटी डॉलर्स  खर्च करून बनविलेल्या या चित्रपटाने ३२ कोटी डॉलर्सची कमाई केली.  हा चित्रपट मुद्दामच ब्लॅक अँड व्हाईटमध्ये चित्रित केला होता.

मंगळवार, १९ मे, २०२०

डेक्कन क्रॉनिकल या प्रतिष्ठित दैनिकाने टूर ऑफ ड्युटी ही बातमी देतांना "भक्तांनो, सैन्यात जाण्याची संधी" असे वाक्य शीर्षकात देण्याचे काय कारण असावे? सैन्यात आधीच भाजपचे एक नेते, अर्थ खात्याचे राज्यमंत्री अनुराग ठाकूर (ज्यांच्याकडे निर्मला सीतारामन यांच्या पत्रपरिषदेत अर्थमंत्र्यांनी इंग्रजीत दिलेल्या निवेदनाचे हिंदीत भाषांतर करण्याचे काम असते), हे आधीच प्रादेशिक सेनेत (Territorial Army) अधिकारी पदावर आहेत. एखाद्या राजकीय विचारसरणीशी बांधिलकी असलेली व्यक्ती प्रादेशिक सेनेत कशी काय दाखल होऊ शकते हे मला समजले नाही. दुसरीकडे सनदी अधिकाऱ्यांची सरळ भरती (कोणतीही परीक्षा न देता) सुरू झाली आहे. चित्रपट अभिनेता मनोज वाजपेयीचा भाऊ या योजनेचा लाभार्थी आहे असे समजते. आता सैन्यात अधिकारी व जवान यांची तीन वर्षांसाठी का होईना (पुढे हा कालावधी वाढू शकतो) भरती करून सैन्यात नमो ब्रिगेड निर्माण करायची योजना तर नाही?