शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०१४

 मराठी भारतात ४ थी तर जगात १५ वी 

मराठी ही इंडो-युरोपीय भाषाकुलातील एक भाषा आहे. भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी प्रथम भाषा (मातृभाषा) असणाऱ्यांच्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे. मराठी बोलणार्‍यांची एकूण लोकसंख्या ९,००,००,००० आहे. मराठी भाषा ९व्या शतकापासून प्रचलित आहे. मराठी भाषेची निर्मिती संस्कृतमधून निर्माण झालेल्या महाराष्ट्री प्राकृत व अपभ्रंश या भाषांपासून झाली आहे. 

जास्त माहिती करिता  www. khandabahale.org या संकेत स्थळाला भेट द्या. येथे भारतातील २३ भाषांचे शब्द कोश उपलब्ध आहेत. तसेच इंग्रजीच्या स्पेल चेक प्रमाणे मराठीतील शुद्धलेखनातील चुका शोधून दुरुस्त करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुरेश भट यांनी लिहिलेले व कौशल इनामदार यांनी स्वरबद्ध केलेले व पाचशे गायकांनी गायलेले " लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी " या मराठी स्वाभिमान गीताची दृश्यफीत (व्हिडीओ ) यु ट्यूब वर पाहता येईल.  

राजेंद्र कडू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा