रविवार, २३ फेब्रुवारी, २०१४

जास्त दुर्दैवी कोण ? दाभोळकर की पंड्या कुटुंबीय 

काही महिन्यांपूर्वी सुप्रसिद्ध समाजसेवक नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाला. त्याचा तपास सुरु आहे. तपासातील संथ प्रगतीबद्दल विरोधी पक्ष सरकारवर तोंडसुख घेत आहेत. मुख्यमंत्री, गृहमंत्री व एकूणच महाराष्ट्रातील कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे युती सरकार हे अकार्यक्षम आहे, असा सर्वांचा आरडाओरडा सुरु आहे. खरे पाहता एखाद्या गुन्ह्याचा शोध किती काळात लागेल हे कुणीच सांगू शकत नाही. एखाद्या गुन्ह्याचा शोध घ्यायला महिनोन्महिने लागू शकतात. कधी कधी अचानकच एखाद्या दुसऱ्या गुन्ह्याचा शोध घेतांना आधी घडलेल्या गुन्ह्याचा शोध लागतो. 
दाभोलकर हे कुठल्याही सत्तास्थानावर नव्हते. केवळ एक समाजसेवक होते. मात्र दहा वर्षांपूर्वी गुजरात मध्ये राज्याचे गृहमंत्री असलेले हरेन पंड्या यांचा ते सकाळी फिरायला गेले असतांना त्यांचा खून झाला होत. त्याच्या चौकशीत काय प्रगती झाली आहे हे कळायला मार्ग नाही. मुळात एखाद्या राज्याच्या गृहमंत्र्याचा खून होणे ही गंभीर बाब आहे. राज्याचा गृहमंत्रीच जेथे सुरक्षित नाही तेथील सर्वसामान्य जनता किती सुरक्षित असेल याची कल्पना करता येऊ शकते. तेही मोदी सारख्या कर्तव्य कठोर व कार्य कुशल मुख्यमंत्री असलेल्या राज्यात ही घटना घडावी हे मोदींना किती भूषणावह आहे, हे मोदी प्रशंसकांनीच ठरवावे. गुजरात दंगलींमध्ये तेथील खासदार मदतीसाठी टाहो फोडत होते मात्र खासदाराला सुद्धा गुजरात प्रशासन सुरक्षा देऊ शकले नाही. वाजपेयींनी दिलेला राजधर्म पाळण्याचा दिलेला सल्ला सुद्धा मोदींनी मनावर घेतला नाही.  खोट्या चकमकी घडवून आणून निरपराध लोकांची हत्या केल्याबद्दल गुजरात मधील मोठमोठे पोलिस अधिकारी गजाआड आहेत. सर्वात जास्त पोलिस अधिकारी तुरुंगात असण्याचा मान सुद्धा गुजरात कडे जातो. याही बाबतीत गुजरात राज्य आघाडीवर आहे. व हे सर्व अधिकारी कॉन्स्टेबल किंवा सब इन्सपेक्टर दर्जाचे नसून उच्चाधिकारी आहेत. म्हणजेच गुजरात राज्य म्हणजे शेत खाणाऱ्या कुंपणाने वेधल्या गेले आहे. एका आर्किटेक्ट तरुणीवर गुजरात पोलिसांनी तर पाळत ठेवलीच शिवाय कर्नाटक पोलिसांनाचीही पाळत ठेवण्यासाठी मदत घेण्यात आली. दोन्ही  प्रकरणात दाभोळकर कुटुंब जास्त दुर्दैवी आहे की पंड्या कुटुंबीय हे वाचकांनीच ठरवावे. 
राजेंद्र कडू



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा