सोमवार, ३१ मार्च, २०१४

स. न. वि. वि.
आपला दिव्य मराठीमधील लेख

मला नम्रपणे असे सुचवावे वाटते कि हुकुमशाही नेहमी वाईटच ठरलेली आहे. आपण चीन मध्यें राहत नाही. दुरून डोंगर चांगलेच दिसतात. पाहुण्यांना आपला थाटमाट दाखविण्याकरिता नोकरांचे भरपूर शोषण करावे लागते. इंदिरा गांधींनी आणिबाणी लावण्याचे कारण असे की  "सैनिक व पोलिसांना त्यांच्या वरिष्ठांचे हुकुम अयोग्य वाटले तर ते न पाळण्याचे आवाहन " काही विचारवंतांनी केले होते. त्यामुळे अराजक माजू शकले असते. असे आवाहन स्वातंत्र्य चळवळीतसुद्धा गांधीजींनी कधी केले नव्हते. कारण त्यांना माहित होते की स्वतंत्र भारतात सुद्धा शिस्तबद्ध व जबाबदार सैनिकांची व पोलिसांची गरज असणार आहे. नमो मात्र सैनिकांना चिथावणी देत आहेत. असेच हिटलर करीत होता. एनडीए च्या काळात बांगला देशच्या सैन्याने सोळा भारतीय सैनिकांना हालहाल करून ठार मारले होते, तीन अतिरेकी काबूलला पोहोचवून दिले होते, राष्ट्राचा मानबिंदू असलेल्या संसदेवर अतिरेकी हल्ला झाला होता . पण या गोष्टींचे कॉंग्रेसने कधी भांडवल केले नाही. नमोंना कशाचाही विधिनिषेध नाही. नमो पंतप्रधान झाले तर या गोष्टी अंगलट येऊ शकतात. मधाच्या पोळ्याला खडा मारतांना थोडा विचार करूनच मारायला पाहिजे. सर्वच विचारवंतांनी या गोष्टीचा विचार करायला पाहिले. नमोंनी आता नवीन घोषणा दिली आहे " मर जवान, मर किसान " नमोंचे किती डोके फिरले आहे हे यावरून सिद्ध होते. आपण विचारी आहात. इंदिराजी व नमोंची तुलना होऊ शकत नाही आणि त्यांचा पक्ष तर विचार सुद्धा करू नये इतका पचपचित आहे. आभार
आपला नम्र
राजेंद्र कडू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा