नचिकेतला हवे आहेत स्वयंसेवक ………
मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून नचिकेत बाल वाचनालय गेली दहा वर्षांपासून बाल/किशोरांसाठी नि:शुल्क वाचनालये चालवित आहे. अमरावती शहरात व जिल्ह्यात विसांहून जास्त ठिकाणी सध्या हा उपक्रम यशस्वीरीत्या सुरु आहे. या ठिकाणी दररोज संस्थेने नेमलेली व्यक्ती पुस्तकांची देवाणघेवाण करण्यासाठी हजर असते. पुस्तके मुलांना वाचण्यासाठी घरी नेता येतात. त्यासाठी कुठलेही शुल्क अथवा अनामत रक्कम घेण्यात येत नाही. पुस्तके सुद्धा दर्जेदार असून मुलांची बौद्धिक भूक भागवणारी आहेत. ठराविक कालावधीनंतर पुस्तकाचा नवीन संच केंद्रावर पाठविला जातो.या सर्व उपक्रमामागे डॉ. आशाताई पावगी या भरभक्कमपणे उभ्या आहेत. त्या गेली ४० वर्षांपासून canada मध्ये स्थाईक असून भारतात वाचनाबद्दल असलेली अनास्था बघून त्यांना नचिकेत वाचनालय सुरु करण्याची प्रेरणा मिळाली. मुलांमध्ये वाचनाची आवड जोपासल्या गेल्यास त्यांचे उत्तम नागरिकांमध्ये रुपांतर होऊ शकते व सुद्धृढ लोकशाहीसाठी सुजाण नागरिक हा अनिवार्य घटक आहे असे त्या आग्रही प्रतिपादन करतात. शिवाय वाचनाची आवड असणारी मुले शालेय अभ्यासातही पुढे असतात हे शिक्षण विदांचे मत ही त्या वेळोवेळी मांडत असतात. आशाताईच्या मते वाचन ही एकाच गोष्ट अशी आहे कि ज्यात समाजातील वेगवेगळ्या स्तरातील मुले एका समान पातळीवर असतात. आणि खऱ्या लोकशाहीसाठी हि बाब फारच जरुरीची आहे.
या सर्व उपक्रमात नचिकेतला लोकांचा सहभाग हवा आहे. समाजातील सर्व थरातील घटक उदा. विध्यार्थी, युवक, महिला, जेष्ठ नागआजी बाई रिक, नचिकेतच्या कामात सहभागी होऊ शकतात. हे स्वयंसेवक दररोज दोन तास या कामासाठी देऊन एखाद्या केंद्राची जबाबदारी घेऊ शकतात. त्यामुळे नचिकेतला आपला कार्य विस्तार करायला फार मोलाची मदत होऊ शकते.
दुसरे असे की एक असे ही संशोधन झाले आहे की मुलांना गोष्ट ऐकण्याची फार आवड असते व अशा या गोष्ट ऐकण्याच्या सवयीतून वाचनाची सवय मुलांना लागते. यालाच आशाताईनी leading to reading म्हणजेच श्रवण ते वाचन असे म्हटले आहे. हा वाचनाची आवड लावण्याकरिता फारच उपयोगी असा फॉंर्मुला असे त्यांचे म्हणणे आहे. आधुनिक काळात गोष्टी सांगणाऱ्याआजीबाई दुर्मिळ झाल्या आहेत. तेंव्हा कथाकथन करू शकणारे स्वयंसेवक जर नचिकेतला मिळाले तर हा जगन्नाथाचा रथ जोमाने पुढे जाईल यात शंका नाही. तेंव्हा मुलांसाठी असे कथाकथन करू शकणारे स्वयंसेवक ही नचिकेतला हवे आहेत. आपण या उपक्रमात सहभागी होऊ इच्छित असल्यास कृपया नचिकेत बाल वाचनालयाशी ०७२१-२६७०१५५ या क्रमांकावर संपर्क साधावा.
राजेंद्र कडू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा