भाजपचे पुन्हा, रामा तुज नमो!
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी विकास आणि गतिमान
प्रशासनाची स्वप्नपेरणी केली असताना आणि "कुछ गलती हुई हो तो हम शीष नमाकर
माफी माँगते है", अशी साखरपेरणी पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी केलेली
असतानाही भाजपने सोमवारी जारी केलेल्या जाहीरनाम्यात राममंदिर, कलम ३७० आणि
समान नागरी कायदा हेच जुने मुद्दे उगाळले आहेत. या जाहीरनाम्यावर सर्वच
राजकीय पक्षांनी टीकेची झोड उठविली असली तरी संघ परिवाराने आनंद व्यक्त
केला आहे. (लोकसत्ताच्या दिनांक ०८/०४/२०१४ च्या अंकातील बातमी )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा