मनमोहनसिंगजी, सध्याच बांधाबांध करू नका ……….
आदरणीय मनमोहनसिंगजी,
आजच बातमी वाचली कि आपण सामानाची बांधाबांध सुरु केली आहे व १७ मे रोजीच पंतप्रधान निवास सोडण्याची तयारी केली आहे. पण माझ्या मते आपण इतक्यातच बंगला सोडण्याची घाई करू नये. कारण १६ मे नंतर काय परिस्थिती असेल याची कुणालाही पूर्व कल्पना नही. निवडणुकीनंतर जर त्रिशंकू लोकसभा अस्तित्वात आली व एनडीए ला बहुमत मिळाले नाही किंवा मोदी जर घटक पक्षांना चालणार नसतील किंवा एनडीएचे सत्तेत येणे शक्य झाले नाही व तिसरी आघाडीही सत्ता स्थापन करू शकली नाही तर तिसऱ्या आघाडीच्य पाठीम्ब्याने कॉंग्रेस पुन्हा सत्तेत येऊ शकते.
मात्र घटक पक्षातील मंडळी राहुल गांधी पंतप्रधान नको अशी ट घालू शकतात. इतर पक्ष्यात बरीच ज्येष्ठ मंडळी आहे व त्यांना राहुल गांधीसारख्या अननुभवी व कनिष्ठ व्यक्तीच्य नेतृत्वात काम करणे रुचण्या सारखे नाही. दोन महिन्यांपूर्वीच शरद पवार यांनी राहुल गांधी हे पंतप्रधानपदासाठी पात्र नाहीत असे वक्तव्य केले होते व निवडणूक प्रचारासाठी राहुल गांधींच्या व्यासपीठावर येण्याचे टाळले होते. राजीव गांधी पंतप्रधान झाले तेंव्हापासूनच त्यांच्या मनात सल निर्माण झाली आहे. राजीव गांधी सुद्धा शरद पवार यांच्यापेक्षा वयाने व राजकारणाच्या अनुभवाने कनिष्ठ होते. पण इंदिरा गांधींच्या हौतात्म्यामुळे राजीव गांधींना लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला प्रचंड बहुमत मिळाले व नंतर राजीव गांधीच्या हत्येननतरसुद्धा सहानुभूतीच्या लाटेमुळे परत कॉंग्रेसला परत तसेच बहुमत मिळाले. पण तेंव्हा नरसिंहरावसारख्या जेष्ठ नेत्यामुळे शरद पवार यांना संरक्षण मंत्री पदावर समाधान मानावे लागले होते. शरद पवार राहुल यांच्या वडिलांच्यापेक्षाही वयाने मोठे आहेत.युपीए च्या घटक पक्षातील ज्येष्ठ मंडळी व पाठींबा देणारी तिसरी आघाडी ही राहुल गांधींच्या नावाला विरोध करू शकते.
१९८५ च्या निवडणुका आटोपताच नरसिंहराव यांनी आपल्या सामानाची बाधाबांध केली होती व हैदराबाद येथे कायमचे राहावयास जाणार होते . परंतु राजीव गांधी यांच्या खुनानंतर त्यांना पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळावी लागली होती. तशीच वेळ पुन्हा येऊ शकते तेंव्हा आपण तूर्तास आपण सामानाची बांधाबांध करू नये व निवडणूक निकालाची वाट पहावी असे नम्रपणे सुचवावेसे वाटते.
आपला नम्र,
राजेंद्र कडू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा