मोदींचे फोटो लावण्याची घाई! मुंबई
। मोदी पंतप्रधानपदी विराजमान होऊन 45 दिवस उलटले तरी महाराष्ट्रातील
सर्व सरकारी कार्यालयामंध्ये नव्या पंतप्रधानांचे फोटो न लागल्याने भाजप
अस्वस्थ झाली आहे. मोदींचे फोटो लावण्याची प्रचंड घाई झालेले भाजपचे
शिष्टमंडळ त्यासाठी बुधवारी राज्यपाल के. शंकरनारायणन यांची भेट घेणार आहे.
केंद्र सरकारकडून मोदींचे एका आकाराचे आणि एकच छबी असलेले फोटो उपलब्ध
करण्यात येणार असून ते सुरुवातीला राज्याच्या प्रमुख सरकारी
कार्यालयांमध्ये लावण्यात यावेत अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने केली आहे.
या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची कृती उठून दिसते. श्री. सिंग यांनी २००४ साली पहिल्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यावर असा आदेश काढला की त्यांचे छायाचित्र कुठल्याही शासकीय कार्यालयात लावू नये तसेच त्यांना कारणाशिवाय उठसुठ दुरदर्शनवर दाखवू नये.
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा