महागाईची स्वस्ताई सत्तेवर आल्यानंतर मोदी आणि मंडळींना
महागाईसारख्या विषयावर वास्तव भूमिका घ्याव्या लागत आहेत. कांदा-बटाटय़ाचा
समावेश जीवनावश्यक वस्तूंत करून भागणार नाही, तर याकामी राज्यांचे
सहकार्यही हवे, हा यापैकीच एक मुद्दा. असे आणखीही उपाय पुढे आले, तरी
महागाई कमी होत नसते हे जनतेस सांगण्याची हिंमत राज्यकर्त्यांस येईपर्यंत
आपले राजकारण स्वस्तच राहील..
महागाई ही वयासारखी असते. ती कधीच कमी होत नाही. तरीही वय आणि महागाई यात एक मूलभूत फरक आहे. तो हा की वय वाढणे थांबविता येत नाही. परंतु महागाईचे तसे नाही. ती काही प्रमाणात काही काळ रोखता येऊ शकते. हे प्रमाण काय असावे आणि काळ किती असावा याचा निर्णय साक्षेपाने घ्यावयाचा असतो आणि तो आसपासच्या अनेक घटकांवर अवलंबून असतो, याचे भान असावे लागते. ते सुटले तर काय होते याचा अंदाज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कंपूला एव्हाना आला असावा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा