रविवार, १४ सप्टेंबर, २०१४

पत्रकारांनी अभ्यास करावा बातमी 

अटलजींनी  पहिले हिंदी भाषण पंतप्रधान नसतांना केले होते - " संयुक्त राष्ट्रसंघातही पंतप्रधान मोदी हिंदीतच बोलणार , मोदी हे हिंदीतून भाषण करणारे दुसरे पंतप्रधान. पहिले अटल बिहारी वाजपेयी "- बातमी. वास्तव पंतप्रधान म्हणून वाजपेयींनी हिंदीत केलेले भाषण पहिलेवहीले नव्हाते. त्यापूर्वी इंदिराजींनी संयुक्त राष्ट्रसंघात भारतीय प्रतिनिधीमंडळाचे नेता म्हणून कॉंग्रेस पक्ष्याच्या व्यक्तीला न पाठवता अटल बिहारी हे विरोधी पक्षात असून वाजपेयींना पाठविले. त्यामुळे वाजपेयींना युनोत हिंदीत भाषण करण्याची संधी मिळाली. आणखी एक येथे सांगितले पाहिजे की लोकसभा निवडणुकीत वाजपेयी पराभूत झाले तेंव्हा अटलजी सारखी व्यक्ती संसदेत हवी म्हणून नंतर झालेल्या राज्यसभा निवडणुकीत कॉंग्रेसचे जितके सदस्य निवडून ये शकत होते त्यापेक्षा एक उमेदवार कमी देऊन अटलजींना निवडून आणले. हा खिलाडूपणा आता इतिहासजमा झाला आहे. " विरोधी पक्षाला सन्मानेने वागविणे आताच्या सत्ताधारी पक्षाला जमेल असे वाटत नाही. असहिष्णुता के दिन आ गये है "

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा