शनिवार, ११ ऑक्टोबर, २०१४

एक ज्वलंत प्रश्न कुठे सीएनजी आधारित विद्युतदाहिन्या, कुठे 'केमिकल हायड्रॉलिसिस' प्रक्रिया..  देशोदेशी अन्त्यसंस्काराच्या पद्धती बदलत आहेत. त्यात मेलेल्यांच्या पुढील प्रवासापेक्षा मागे राहिलेल्यांच्या जगण्याची काळजी आणि पर्यावरणाची चिंता आहे. आपल्या केंद्रीय मंत्री  उमा भारती यांना मात्र त्याचे काय? त्यांच्या दृष्टीने जाळावे ते कसे हाच खरा ज्वलंत प्रश्न आहे.
केंद्रीय जलसंसाधनमंत्री सुश्री उमा भारती यांचा अध्यात्मातील अधिकार किती थोर याची आम्हांस कल्पना नाही. परंतु तो जरा जास्तच थोर असावा. याची कारणे दोन. एक म्हणजे तसे नसते तर पंतप्रधान मोदी यांनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिलेच नसते. उमाबाई या ओबीसी नेत्या आहेत किंवा त्यांच्या समावेशाने मंत्रिमंडळास भगवा रंग येऊन भगवी मंडळी खूश होतील ही काही मोदी यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट असू शकत नाही. दुसरे कारण म्हणजे त्यांचा अधिकार थोर नसता तर त्यांना जगातील यच्चयावत् गोष्टींचे अगाध ज्ञान झालेच नसते. त्यांच्या या अमर्याद बुद्धिमत्तेचे दर्शन वेळोवेळी भारतातील कोटय़वधी अज्ञ जनांना होतच असते. गेल्या महिन्यात ते केदारनाथ खोऱ्यातील महाप्रलयानंतरच्या पुनíनर्माणाच्या कामासंबंधी झालेल्या चर्चेदरम्यान झाले. डेहराडूनला ही चर्चा झाली. बडी बडी तज्ज्ञ मंडळी त्या विचारमंथनात सहभागी झाली होती. उमाजींनी त्यांच्यासमोर भाषण करून त्यांना बऱ्याच वैज्ञानिक गोष्टी समजावून सांगितल्या. त्यांच्यासमोरचा मूळ प्रश्न होता केदारनाथ खोऱ्यात असा महाप्रलय आलाच कसा? पुनíनर्माण वगरे ठीकच आहे. ते होतेच. परंतु खरा प्रश्न नसíगक प्रकोपाची कारणे शोधून काढण्याचा असतो. उमाजींनी ती कारणे आपल्या दिव्य अभ्यासातून शोधलीसुद्धा. त्या म्हणाल्या, विटाळामुळे ही वाताहत झाली. केदारनाथ हे पवित्र तीर्थक्षेत्र. त्याभोवती सरस्वती आणि मंदाकिनी या नद्यांनी नसíगक हद्द तयार केली होती. त्या हद्दीत मानवी मलविसर्जनाला मज्जाव होता. हे सगळे १८८२ पर्यंत. नंतर तेथे व्यापाराच्या उद्देशाने नास्तिक मंडळी आली. त्यांनी तेथे मलविसर्जनास प्रारंभ केला आणि त्या विटाळाने निसर्ग कोपला. तेव्हा महाप्रलय रोखण्यासाठी आधी मलविसर्जन रोखले पाहिजे. नरेंद्र मोदी यांच्या शौचालयनिर्मिती मोहिमेस उमाजींच्या या तर्काधिष्ठित शोधाने केवढे बळ लाभणार आहे याची केवळ कल्पनाच केलेली बरी. हे झाले केदारनाथच्या महाप्रलयाबाबत. उमाजींकडे गंगेच्या शुद्धीकरणाचीही जबाबदारी आहे. तेव्हा त्याबाबतही त्यांच्याकडे काही क्रांतिकारी विचार आहेत. नुकतेच तेही त्यांनी मांडले. हा अग्रलेख सविस्तर वाचण्याकरिता  www.loksatta.com ला भेट द्या 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा