|
|
मिडीयाचा भाजपला दणका
साेशल मीडियाने यंदाही निवडणुकीत अापलं
अस्तित्व दाखवून दिलं असून, भाजपला अक्षरश: अापली जाहिरात बदलावी लागली
अाहे. भाजपने " कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ? "असा प्रश्न करणाऱ्या
जाहिराती महिनाभरापूर्वीच पुढे अाणल्या हाेत्या. या जाहिरातींचा इतका मारा
झाली की, महाराष्ट्रातील लाेकांचा स्वाभिमान जागृत झाला. त्यानंतर या
जाहिरातींच्या विराेधातील पाेस्ट सुरू झाल्या. महाराष्ट्रापेक्षा गुजरातपेक्षा
प्रत्येक क्षेत्रात कसा श्रेष्ठ अाहे, हे दर्शविणाऱ्या पाेस्टाचा साेशल
मीडियावर अक्षरश: पाऊसच पडायला लागला. या जाहिराती निवडणुकीतील वारे फिरवू
शकतात, हे भाजपच्या लक्षात अाल्यानंतर भाजपच्या काेअर कमिटीची बैठक
झाली. त्यात या जाहिरातींवर दीर्घकाळ विचारमंथन करण्यात अाले.
महाराष्ट्राचे नकारात्मक चित्र दर्शविणाऱ्या या जाहिराती मागे घेण्याचा निर्णय काेअर कमिटीच्या बैठकीत घेण्यात अाला. साेशल मीडिया किती परिणामकारक
अाहे, हे भाजपच्या या निर्णयातून दिसून अाले. विशेष म्हणजे या निर्णयाची खिल्ली उडविणाऱ्या पाेस्टही शुक्रवारी दिवसभर व्हाॅट्सअॅप अाणि फेसबुकच्या वाॅलवर फिरत हाेत्या. (दिव्य मराठी) |
|
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा