बुधवार, ८ ऑक्टोबर, २०१४

कुठे नेउन ठेवलंय तुझ्या गुजरातला ? 

 मागील वर्षी महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळी परिस्थितीत मदत म्हणून गुजरातमधील एका जिल्हा दुध उत्पादक संघाने गुरांसाठी पशु खाद्य पाठविले होते. त्यासाठी पुण्यात एक जंगी कार्यक्रमही झाला होता. मात्र ही गोष्ट तेंव्हा मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांना सहन झाली नाही. कारण त्या जिल्हा दुध उत्पादक संघाचा अध्यक्ष हा मोदी यांच्या  गटातील नव्हता. तेंव्हा गुजरात सरकारने आपल्या अखत्यारी त असलेल्या सहकार खात्यांच्या अधिकाऱ्यामार्फत त्या जिल्हा दुध उत्पादक संघाला नोटीस बजावून तुम्ही  ही मदत कुणाच्या परवानगीने केली याचे उत्तर मागविले व ह्या पशुखाद्याची किंमत वीस कोटी रुपये महाराष्ट्राकडून वसूल करण्याचे आदेश दिले. शिवाय याच गोष्टीचा फायदा घेऊन विरोधी गोटात असलेल्या दुध संघाच्या अध्यक्षाला या प्रकरणाला जबाबदार म्हणून पदच्युत करण्यात आले. नाइलाजाने त्या दुध संघाच्या अधिकाऱ्याना, या मदत म्हणून दिलेल्या पशुखाद्याची रक्कम चुकविण्याची नोटीस महाराष्ट्र सरकारला द्यावी लागली. अशा प्रकारे मोफत म्हणून दिलेल्या मदतीचा मोबदला मागण्याच्रे हे जगाच्या इतिहासातील पहिलेच उदाहरण  असावे. या प्रकारणावरून मोदींना महाराष्ट्राबद्दल किती आकस आहे हे स्पष्ट होते. याच मोदींच्या गुजरातमधील काठेवाडी जनावरे महाराष्ट्रात सुखेनैव चरत असतात आणि महाराष्ट्रातील शेतीची व जंगलाची नासधूस करत असतात त्याची मोदींना अजिबात चाड नाही. परप्रांतातील माणसेच नाही तर गुरे सुद्धा महाराष्ट्रावर अवलंबून आहेत. सुरेश भटांनी आपल्या मराठी स्वाभिमान गीतात म्हटलेच आहे, "पाहुणे अनेक पोसते मराठी ". मोदींच्या या कृतीमुळे गुजरात म्हणजे कृतघ्नप्रदेश अशी प्रतिमा निर्माण होणार नाही काय ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा