बुधवार, ३१ डिसेंबर, २०१४

" उशिरा आले तर उशिरा घरी जा "- मुख्य मंत्री. वेळेवर येऊनही आम्ही काम करत नाही, उशिरा येउन  काय फत्रा काम करणार ? तुम्हा  टेम्परवारी लोकाना मधून मधून आम्हां परमनंट लोकाना चांगल्या सवई लावायची लटक येतेच. अर्थात आम्ही खूप काही करतो आहो हे जनतेला दाखवावेच लागते म्हणा. तुम्ही दरारा दाखवा आम्ही भ्यायल्या सारखे दाखवतो असे चालू द्या. गारुडी नाही का साप मुंगसाची लढाई दाखवितो असे म्हणतो व गल्ला गोळा करून पोबारा करतो. आमची (नोकरांची) व तुमची (राजकारण्यांची ) अभेद्य ( की अभद्र ) युती आहे हे या दुधखुळ्या जनतेला कळणार नाही याची मात्र काळजी घ्या फडणवीस साहेब.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा