मेरे देशकी धरती …
महाराष्ट्रात फक्त शेतकरीच शेतजमीन विकत घेऊ शकतात. म्हणजे तुम्हाला शेतजमीन विकत घ्यायची असेल तर त्यापूर्वीच तुमच्या नावाचा सातबारा असे आवश्यक आहे. तुम्ही शेतकरी नसाल तर तुम्हाला शेती विकत घेण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्याची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. महानायकाने पुण्याजवळ विकत घेतलेल्या घेतलेल्या शेतजमिनीबद्दल असाच वाद उदभवला होता. तेथील कर्तव्यदक्ष तहसीलदाराने या संदर्भात महानायकाला नोटीसही बजावली होती. हे प्रकरण बरेच गाजले होते. शेवटी महानायकाला युपीमध्ये कुठल्यातरी आडगावात शेती असल्याचा दाखला मिळवावा लागला होता. तुमच्याही गावात/शहरात असा एखादा व्यवहार झाला आहे असा तुम्हाला संशय असल्यास त्याप्रकारणाबाबत तुम्ही जिल्हाधिकारी अथवा सक्षम अधिकाऱ्याकडे माहितीच्या अधिकाराअंतर्गत माहिती मागून असा गैरप्रकार उघडकीस आणू शकता व गोरगरीब शेतकऱ्यांच्या शेतजमिनी इन्कम ट्याक्स वाचविण्यासाठी विकत घेणाऱ्या धनदांडग्यापाऊन वाचवू शकता. अर्थात शेतकरी आपली नड म्हणून शेती विकत असतो. पण तुम्ही दखल दिली तर खऱ्या शेतकऱ्याकडेच ही शेतजमीन जाईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा