गुरुवार, ५ फेब्रुवारी, २०१५

कॉंग्रेसवर मुस्लिमांचे लांगुलचलन करण्याचा आरोप होतो. कॉंग्रेसने ओवेसीवर कारवाई केली नाही म्हणून तो डोईजड होत आहे असे काही मंडळी म्हनतात. मग मुशर्रफला बासुंदी खाऊ घालणारे वाजपेयीजी व नवाज शरीफसाठी पायघड्या घालणाऱ्या नरेंद्र मोदी यांना काय म्हनाल ? बासुंदी प्रकरणानंतर लगेच कारगिल घडले होते. ओवेसीची काळजी करू नका. कुठल्याही धर्मातील कट्टरवाद्यांना त्या धर्मातील जनता  त्यांना त्यांची जागा दाखवून देते आपण  वारंवार पाहिले आहे. रामाच्या नावाने सत्ता मिळवनार्यांना पाच वर्षातच घरी बसवले. जनतेचे नाव घेऊन १९७७ साली सत्तेवर आलेले 'जनता' सरकार २८ महिन्यातच कोसळले. आताही जनतेने मोदींना सत्ता दिली ती सुप्रशासानाची आशा ठेवून. मोदींनी जर हिंदू राष्ट्रवादाचा अगेंडा पुढे केला तर त्यांचाही 'मोरया' (मोरारजी देसाई) व्हायला वेळ लागणार नाही. भारत हा बहुधर्मीय, बहुभाषिक देश असल्यामुळे पाकिस्तानसारखी स्थिती होणे शक्य नाही. अर्थात काही नतद्रष्टांनी भारताचा लेबनॉन करायचे ठरविले तर मात्र विनाशासाठी तयार रहा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा