शनिवार, २८ फेब्रुवारी, २०१५

१) समोरच्याने अमुक एक भाषाच बोलावी असा माझाही आग्रह नसतो. पण त्यानेही " माफ किजिये मुझे मराठी नही समजती कृपया हिंदीमे बात किजिये." असे म्हणू नये अशी माफक अपेक्षा ठेवतो. २) प्रश्न अपमानाचा नाही, उपेक्षेचा आहे. मराठीत उदघोषणा, संचलन नाही केले तरी चालते, मराठीत पाट्या नसल्या तरी चालतात असे मराठीला गृहीत धरणे चालू आहे (महाराष्ट्रात). पाहुण्यांची सोय दोन दिवसच पहायची असते. कायम मुक्कामी आलेली व्यक्ती पाहुणा नसते. आणि भाषेच्या उपेक्षेमुळे मराठी संस्कृती कोपरयात  ढकलली जात आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा