अकबराच्या सैन्याने चित्तोडगड काबीज केल्यामुळे महाराणा प्रताप यांनी जंगलात आसरा घेऊन आपला लढा सुरूच ठेवला. अकबराचे अंकित राजा मानसिंग राणा प्रताप यांची समजूत घालायला आले. मी जसा अकबराशी समझोता केला व त्यामुळे मला दरबारात मानाचे पद मिळाले तसे तुम्हालाही मिळू शकते, सांगायला लागले. त्यावर राणा प्रताप यांचे उत्तर होते "राणाजी तुमचे वैभव तुम्हाला लखलाभ. मला ते जमणार नाही". असे उत्तर प्रत्येक सामान्य माणूस देऊ शकतो. एखादा भ्रष्टाचारी तुमच्याकडे वाम मार्गाने झटपट पैसे कमाविण्याची योजना घेऊन आला तर तुम्ही त्याला नकार द्यालच. पण या कथेचा उत्तरार्ध महत्वाचा आहे. मानसिंग परत जायला निघाले तेंव्हा राणा प्रताप यांनी जेवण करून जायची विनंती केली. जेंव्हा मानसिंग जेवायला बसले तेंव्हा तेथे एकाच ताट वाढलेले होते. यावर मानसिंगांनी विचारले. राणाजी आपण जेवणार नाही काय ? त्यावर राणा प्रताप यांनी उत्तर दिले की "मी नंतर जेवेन, तुमच्या मांडीला मांडी लावून जेवावे अशी तुमची लायकी नाही ? आमच्याही घराला भ्रश्चाटारी मंडळी भेटी देतात. त्यांना "आमच्या घरात पाय टाकायची तुमची लायकी नाही " असे स्पष्ट शब्दात आपण केंव्हा सांगणार की फक्त महाराणा प्रताप जयंतीच साजरी करणार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा