'बजरंगी भाइजान'वरून आठवल, बाबू बजरंगी नामक विहिंप कार्यकर्त्याला गुजरात दंगलीतील नरोडा पाटिया प्रकरणात ९७ लोकांच्या हत्येसाठी मरेपर्यंत कारावास सुनावण्यात आला आहे. तर याच प्रकरणात मोदींच्या गुजरात मंत्रिमंडळातील माजी मंत्री माया कोडनानी यांना २८ वर्षाचा कारावास सुनावण्यात आला आहे. त्या आधी आमदार होत्या. दंगलीनंतर त्यांना मंत्रीपदी बढती देण्यात आली होती. त्या MBBS DGO आहेत. मृतांमध्ये मुले, महिला व वृद्धांचा समावेश आहे. बाबू बजरंगी याच्या 'कर्तुत्वा'ची माहिती त्याच्याच तोंडून ऐकायची असल्यास स्टिंग व्हिडीओ tehlka.com वर उपलब्ध आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा