|
मुस्लिम शासनकाळात हिंदू धर्मावर हल्ला झाला नाही
|
दोन्ही धर्मांत होता आदरभाव : इतिहासकार ऑड्रे ट्रश्के
|
वृत्तसंस्था | वाॅशिंग्टन
|
|
हिंदू आणि मुस्लिमांत कधी एकेकाळी घनिष्ट सांस्कृतिक संबंध होते.
मुघलांच्या शासनकाळात कोणत्याही प्रकारचा धार्मिक किंवा सांस्कृतिक संघर्ष
नव्हता, असा दावा स्टॅनफोर्ड विद्यापीठातील इतिहासकार ऑड्रे ट्रश्के यांनी
"कल्चर ऑफ एन्काउंटर्स' या पुस्तकातून केला आहे. त्यांच्या मते, १६ व्या ते
१८ व्या शतकादरम्यान दोन्ही समुदायांत एकमेकांप्रती खूप सांस्कृतिक आदरभाव
आढळून यायचे. त्यांच्यात कधीच धार्मिक किंवा सांस्कृतिक वाद नव्हते.
धर्मांच्या विभागणीची व्याख्या १७५७ ते १९४७ दरम्यान इंग्रज शासनकाळात
झाली. दरम्यान, १९४० च्या दशकात उपनिवेशवाद संपुष्टात आला होता. मात्र,
दाक्षिणात्य हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वादाला फोडणी देत राहिल्यास फायदा
होईल, असा विश्वास राजकीय हेतूने प्रतित झाला होता. भारतातील सध्याच्या
धार्मिक तणावाचे कारण मुघलकाळात तयार वैचारिक धारणेत अंतर्भूत आहे.
उपखंडाच्या इतिहासाचे वस्तुनिष्ठ आणि योग्य अध्ययन केले जात नाही. उलट
धार्मिक असहिष्णुतेला चुकीचे ठरवण्यासाठी मुघलकाळात अस्तित्वातच नसलेल्या
धार्मिक तणावांचा हवाला दिला जातो, असेही ट्रश्के यांनी पुस्तकात म्हटले
आहे. भारतीय संस्कृती किंवा हिंदू धर्मावर प्रभुत्व मिळवण्याची भारतातील
मुसलमानांची कधीच लालसा नव्हती. |
|
|
|
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा