शुक्रवार, ११ सप्टेंबर, २०१५

सीबीआय सोबत आता एन आय ए सुध्दा पिंजरयातील पोपट होणार काय ?
युपीए सरकार असतांना सीबीआय हा पिजार्यातील पोपट आहे काय असा सवाल कोर्टाने केला होता. त्या सम्बोधनामुळे विरोधकांच्या हातात आयतेच कोलीत मिळाले होते. अर्थात या पोपटाची पिंजऱ्यातून सुटका  होण्याची शक्यता कमीच आहे. उलट त्या पिंजऱ्यात एका नवीन पोपट दाखल होण्याची भीती निर्माण झाली आहे.  मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणी नरमाईचे धोरण ठेवावे यासाठी राष्ट्रीय तपास संस्थेने (N I A) दबाव आणला होता असा सरकारी वकील रोहिणी सालियन केला होता. आता रोहिणी यांना या खटल्यातून हटविण्यात आले. त्याबद्दल  सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार व एन आय ए यांना  जाब विचारला आहे. हा खटला काय आहे. या खटल्यां बद्दल दिव्य मराठी मध्ये आलेली माहिती --
"या खटल्यात लेफ्टनंट कर्नल एस. पी. पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यासह ११ आरोपी आहेत. चार हजार पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मालेगाव बॉम्बस्फोट मुस्लिमबहुल भागाला लक्ष्य करून घडवण्यात आला आहे, असा आरोप त्यात करण्यात आला आहे. या बॉम्बस्फोटात ४ जण ठार झाले होते, तर ८० पेक्षा जास्त लोक जखमी झाले होते. (दिव्य मराठी). 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा