शुक्रवार, १३ नोव्हेंबर, २०१५

औषध कंपन्यांच्या "आरोग्यासाठी" जेनेरिकचा देशभर तुडवडा

ब्रॅन्डेडअाैषधांच्या नावाने रुग्णांची माेठ्या प्रमाणात हाेणारी अार्थिक लूट थांबवण्यासाठी माेदी सरकारने 'जेनेरिक अाैषधी' लाेकांपर्यंत पाेहोचवण्याचा घेतलेला निर्णय हा केवळ प्रसिद्धीपुरता मर्यादित राहिला अाहे. प्रारंभी सहज मिळणाऱ्या अाैषधींचे खासगी कंपन्यांना फायदा पाेहोचवण्यासाठी सरकारने गेल्या चार महिन्यांपासून वितरण थांबवले अाहे. यात काेट्यवधी रुपयांचे 'डिल' झाल्याची शक्यता वर्तवली जात अाहे.
डाॅक्टरांकडून रुग्णांना ज्या ब्रॅन्डेड अाैषधी लिहून िदल्या जातात त्यात त्या डाॅक्टरांचे 'हित' असते. अाैषधनिर्मितीच्या दाेनशे ते चारशे पट िकमतीने अाैषधी िवकून लाेकांचे िखसे खाली केल्या जातात. माेदी सरकार सत्तेत अाल्यानंतर ज्या-ज्या गाेष्टी जनसामान्यांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या अाहेत त्यात जेनेरिक अाैषधीसुद्धा हाेत्या. पुढच्या चार वर्षांत प्रत्येक गावागावांत जेनेरिक अाैषधे पाेहोचवू, अशी घाेषणा केंद्रीय रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केली हाेती. काँग्रेसच्या काळात खासगी कंपन्यांना लाभ िमळावा म्हणून जेनेरिक अाैषधांची दुकाने उघडल्या गेली नाहीत आणि जे बाेटावर माेजण्याइतके अाहेत त्यात केवळ १०२ अाैषधीच उपलब्ध करण्यात अाल्याचे ना. अहीर वारंवार सांगून अाम्ही िकती चांगले म्हणून पाठ थाेपटवून घेत हाेते. अहीरांच्या मते माेदी सरकार सत्तेत अाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यांत जेनेरिक अाैषधींचा अाकडा ५०४ वर नेण्यात अाला. वर्षाअखेर एक हजारांवर जेनेरिक अाैषधी उपलब्ध करण्यात येतील त्यात कर्कराेग, क्षयराेग अादी राेगांवरील अाैषधी ८० ते ९० टक्के कमी िकमतीमध्ये उपलब्ध हाेणार असल्याचे सांगण्यात अाले हाेते. एक हजार उर्वरित.पान १२

अाैषधांचाअाकडा दूरच राहिला. सहा महिन्यांपूर्वी सरकारकडून ५०४ अाैषधांचा सांगण्यात अालेला अाकडाही िदशाभूल करणारा अाहे. सध्या जेनेरिक अाैषधांच्या दुकानांमध्ये १५० ते १९० प्रकारच्या अाैषधीच उपलब्ध हाेत अाहेत. डाॅ. मनमाेहन िसंग यांच्या सरकारमध्ये असलेली िस्थती अाजही कायम अाहे; त्यात जराही बदल झालेला नाही. ना. अहीर अाणि इंडियन मेडिकल असाेसिएशन(अायएमए)ने जून २०१५ राेजी िदल्लीत जेनेरिक अाैषधीचे दुकान सुरू करताना १५ अाॅगस्ट २०१५ पर्यंत देशभरातील १४०० अायएमएच्या शाखांमध्ये जेनेरिक अाैषधांचे दुकान सुरू हाेईल, अशी घाेषणा केली हाेती. परंतु, िदल्ली वगळता एकाही ठिकाणी हा उपक्रम सुरू झालेला नाही. अहीर यांनीही याबाबत पाठपुरावा केला नाही.
माेदी सरकार जेनेरिक अाैषधी िकती स्वस्त उपलब्ध करून देत अाहे याबाबत ना. अहीरांनी काही उदाहरणे िदलीत; त्यानुसार एम्लाेिडपाइन १० गाेळ्या २० रुपयांना िमळतात. त्या जेनेरिकमध्ये केवळ अडीच रुपयांमध्ये िमळत अाहेत. वेदनाशामक गाेळ्या ३० रुपयांहून रुपयांवर, रक्तदाबावरील गाेळ्या ९४ रुपयांहून १० रुपये, तापावरील गाेळ्या ४२ रुपयांहून साडेतीन रुपये, साखरेच्या अाजारावरील गाेळ्या ६६ रुपयांहून केवळ तीन रुपयांवर, प्रतिजैविक १५० रुपयांहून ४१ रुपयांमध्ये उपलब्ध हाेत अाहे. यासंदर्भात ना. अहीर यांना िवचारले असता, अाम्हीच अाैषधीनिर्मिती करू तेव्हा सगळे सुरळीत हाेईल, असे सांगून त्यांनी सध्याच्या िस्थतीवर भाष्य करण्याचे टाळले. जनअाैषधी िवभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. डी. श्रीकुमार यांनी दिव्य मराठीसाेबत बाेलताना सांगितले, तुटवडा नाही, दुकानदारांकडून अाैषधींची मागणीच हाेत नाही. दुकानदारांनी मात्र सरकारची खासगी कंपन्यांशी हातमिळवणी असल्याचा अाराेप केला अाहे.
५०४ नव्हे, केवळ १५० अाैषधी
सरकारच्यामुबलक प्रसिद्धीबाजी नंतर रुग्ण जेनेरिक अाैषधांच्या दुकानात जायला लागला प्रारंभी त्यांना अाैषधी िमळायला लागल्यात. त्यामुळे खासगी कंपन्यांचे माेठे नुकसान व्हायला लागले. दरम्यानच्या काळात या कंपन्यांचे सरकारच्या दाेस्तीचे गुपित उलगडले नाही. परंतु, ५०४ अाैषधींवरून केवळ १५० अाैषधींचा पुरवठा करून सरकारने खासगी कंपन्यांना 'मदतीचा हात' िदला अाहे. गेले तीन महिने कॅल्शियम, अायर्न अादी अाैषधी उपलब्ध नाहीत, सात्याने पाठपुरावा करूनही सरकारकडून उपलब्ध हाेत नसल्याचे िदल्लीतील दुकानांमधून माहिती िमळाली.
देशभर केवळ १०७ दुकाने
पंतप्रधाननरेंद्र माेदी हे १४ अाॅगस्ट २०१५ राेजी जेनेरिक अाैषधी अभियानाचा शुभारंभ करणार हाेते. या िदवशी देशभरात तीन हजार अाैषधींची दुकाने सुरू करण्यात येणार हाेती. परंतु, शुभारंभही झाला नाही तीन दुकानेही हे सरकार त्या िदवशी सुरू करू शकले नाही. अाज देशभर जेनेरिक अाैषधांची अधिकृत दुकाने केवळ १०७ अाहेत. ना. अहीर यांनी २०१९ पर्यंत ५० हजार जेनेरिक अाैषधांची दुकाने उघडण्याच्या अाणि प्रत्येक दुकानाला लाख रुपयांची माेफत अाैषधे देण्याची घाेषणा केली अाहे; वर्ष उलटले. मात्र, यात जराही प्रगती नाही.
अाैषध कंपन्यांच्या 'आरोग्या'साठी जेनेरिकचा देशभर तुटवडा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा