घोडेबाजार ……
जेष्ठ सभागृहाच्या निवडणुकांमध्ये घोडेबाजार झाला अश्या बऱ्याच बातम्या वाचायला मिळाल्या. निवडणूक आयोग अशा बातम्यांची काही दखल वगैरे घेत असतो काय ?२०१३ च्या लोकसभा निवडणुकांच्या संदर्भात तर एक धक्कादायक बातमी प्रतिष्ठित व लोकशक्ती समजल्या जाणाऱ्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाली होती ती अशी - "मोदींनाच पंतप्रधान करायचे हे लक्ष्य ठेवून मुंबईतील गुजराती मारवाडी मतदार मुंबईतील मतदान आटोपून दुबार मतदानासाठी आपल्या गावी जाण्यासाठी सज्ज झाले आहेत व त्यासाठी त्यांनी खाजगी बसेसही बुक केल्या आहेत." या गोष्टीचीही कुठलीही दखल घेतलेली दिसत नाही.
‘महंगाई
बढानेवालो.. जनता माफ नही करेगी..’ निवडणुकीच्या काळात ही जाहिरात प्रचंड
गाजली होती. या जाहिरातीतील काकूही तेवढय़ाच प्रसिद्ध झाल्या होत्या. देशात
सत्तांतर होऊन १९ महिने आणि राज्यात सत्तांतर होऊन १३ महिने झालेत. या
कालावधीत त्या काकूंचे एकदाही दर्शन झाले नाही. मला त्या काकूंना आताच्या
महागाईबद्दल प्रश्न विचारायचा आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता धनंजय
मुंडे यांनी, केंद्र तसेच राज्यातील सत्तांतरापूर्वी आघाडी सरकारच्या
विरोधात करण्यात आलेल्या जाहिराती त्यांच्यावरच उलटवत महागाईचा खरपूस
समाचार घेतला.
जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीच्या प्रस्तावावर मुंडे यांच्या सत्ताधाऱ्यांना दिलेल्या कानपिचक्या लाजवून गेल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदीचे एक वाक्य ‘न खाउंगा. ना खाने दुंगा.’, हे वाक्य नेमके कशाबद्दल होते, हेच कळेनासे झाले आहे. कारण, त्यांचेच मंत्री खातही आहेत आणि खाऊही देत आहेत. डाळीचे भाव वाढवून मात्र जनतेला डाळ खाऊ देत नाहीत. अशा वेळी मोदींच्या या विधानाचा अर्थच लागेनासा झालाय. ‘बहोत हो गई महंगाई की मांग. अब की बार मोदी सरकार.’ राज्यातील सत्तांतरापूर्वीच्या या जाहिरातीला आता शोधावे लागतेय. डाळीच्या वाढलेल्या दरांबद्दल कुणीच बोलायला तयार नाही. तूर, मसूर आणि मुगाच्या डाळीचे दर २०० रुपयांवर गेलेत. त्यामुळे सर्वसामान्यांना या डाळी त्यांच्या आहारातून वज्र्य करण्याची वेळ आलीय. आता या डाळीच सर्वसामान्य नागरिक खाणार नाही, तर शौचालयात जाणार कसा? एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर शौचालये बनविण्याची गरजच आता मोदींना नाही. कारण, ‘खायेगा इंडिया, तभी तो जायेगा ना इंडिया!’ धनंजय मुंडेंच्या या कानपिचक्यांनी समोरच्या बाकावरील सत्ताधाऱ्यांनाही मूग गिळून बसण्याची वेळ आणली. - See more at: http://www.loksatta.com/maharashtra-news/essential-commodities-price-rise-during-bjp-government-in-maharashtra-1176165/#sthash.9nWnS3Xw.dpuf

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा