शुक्रवार, २५ डिसेंबर, २०१५

अचानक भेट की सावधगिरीचा पवित्रा ………


मोदींनी जर पाकिस्तानला रीतसर भेट द्यायचे ठरविले असते तर पाकिस्तानातील भारतविरोधी गट सक्रिय झाले असते. कारण तेथील लोकनियुक्त सरकार हे नामधारी आहे. मुल्ला-मौलवी आणि पाकिस्तानी लष्कर यांना डावलून नवाज शरीफ काहीच शकत नाहीत. मोदींच्या शपथविधी (की राज्याभिषेक)साठी हजर राहण्यासाठीसुद्धा शरीफांना लष्कराची परवानगी घ्यावी लागली होती.
पाकिस्तानातील मुलतत्ववाद्यांचा भारताला कट्टर विरोध आहे.  रीतसर भेटीची तारीख जाहीर झाली असती तर तेथील भारतविरोधकांनी मोर्चेबांधणी सुरु केली असती. व अत्यंत तणावात ही भेट पार पाडावी लागली असती. कदाचित GO Back Modi अश्या फलकांनाही सामोरे जावे लागले असते. कदाचित दौरा रद्दही करावा लागला असता.
आता पुन्हा दुसऱ्यांदा जर मोदी ठरवून पाकिस्तान दौऱ्यावर गेले तर फारसा विरोध न होण्याची शक्यता आहे. कारण आईबाबांचा विरोध असणाऱ्या प्रेमी युगुलाने पळून जाउन लग्न केले तर पालकांच्या हातात काहीच उपाय राहत नाही आणि मग पुढे मग पालकांचा विरोध सौम्य होतो हा आपला नेहमीचा अनुभव आहे.
मोदी-शरीफ राजी, तो क्या करेंगे (पाकिस्तानके) काझी और हिंदुस्थानके मोदीभक्त.
मोदीभक्तही तोपर्यंत या धक्क्यातून सावरलेले असतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा