डबल सहिष्णुता ……….
सहिष्णुता क्रमांक एक
-- तुर्कमेनिस्तान या मुस्लिमबहुल देश भारत या धर्मनिरपेक्ष देशाला पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा करणार आहे. ही पाईपलाइन अफगाणिस्तान व पाकिस्तान या दोन मुस्लिमबहुल देशांमधून येणार आहे.
एनडीए सरकारमधील मणिशंकर याचा ड्रीम प्रोजेक्ट होता. त्यांनी इराणमधून नैसर्गिक वायू आणण्यासाठी प्रयत्न चालविले होते. परंतु अमेरिकेला हे नको होते. ते तालिबान्यांची भिती दाखवत होते.
सहिष्णुता क्रमांक दोन ---
आज वाचलेली बातमी ----
" वायू प्रकल्पाला तालिबानचा पाठिंबा
|
| काबूल
तुर्कमेनिस्तानहूनअफगाणिस्तानच्या मार्गे भारतापर्यंत पोहाेचणाऱ्या तापी
गॅस पाइपलाइन प्रकल्पाला अफगाण तालिबानने पाठिंबा दिला आहे. या प्रकल्पाचे
अनेक फायदे असल्याचे तालिबानने इंटरनेटवरून केलेल्या पाेस्टमधून स्पष्ट
केले आहेत. हा प्रकल्प १० अब्ज डॉलरच्या मदतीतून तयार केला जात आहे. १३
डिसेंबरला प्रकल्पाची सुरुवात होणार आहे. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी,
पाकिस्तानचे नवाझ शरीफ देखील उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.
सुरुवातीला या प्रकल्पाला तालिबान विरोध करेल, असे वाटत होते, परंतु या
प्रकल्पावर तालिबानने आनंद व्यक्त केला. १९९० च्या दशकात सरकारकडे या
योजनेसाठी पाठपुरावा केला होता, असे तालिबानने म्हटले आहे. २०१९ मध्ये हा
प्रकल्प पूर्ण होईल. त्यामुळे तुर्कमेनिस्तानहून नैसर्गिक वायूचा पुरवठा
अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारताला होणार आहे. प्रकल्पामुळे अफगाणिस्तानला शुल्कापोटी वार्षिक ४० कोटी अमेरिकी डॉलरचा फायदा होणार आहे." |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा