रविवार, १७ जानेवारी, २०१६

संयुक्त महाराष्ट्रासाठी दुसऱ्या लढ्याची तयारी  ………


१७जानेवारी १९५६ ...साठ वर्षांपूर्वी याच दिवशी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला सुरुवात झाली होती. मात्र, साठ वर्षांनंतर बेळगावसह सीमाभाग आजही राज्याबाहेरच आहे. म्हणूनच कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील चार शहरे आणि तब्बल ८६५ मराठीबहुल खेडी जोपर्यंत महाराष्ट्रात येत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्र अपूर्णच आहे, अशी भूमिका घेत महाराष्ट्र एकीकरण समिती (मुंबई) आणि मराठी अभ्यास केंद्र या दोन संस्थांनी संयुक्त महाराष्ट्राचा दुसरा लढा सुरू केला आहे.
 
हुतात्मा दिनाचे औचित्य...
^संयुक्तमहाराष्ट्राच्या चळवळीत हौतात्म्य पत्करलेल्या वीरांना रविवार, दि. १७ जानेवारी रोजी मुंबईतील हुतात्मा चौकात अभिवादन करून या लढ्याची सुरुवात केली जाणार आहे. १७ जानेवारी हा दिन सीमावर्ती भागात हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो, तसा तो संपूर्ण महाराष्ट्रातही पाळला जावा, ही या मागची भूमिका आहे. दीपक पवार, मराठीअभ्यास केंद्राचे प्रमुख
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा