समाजात माध्यम साक्षरता निर्माण करणे आवश्यक | ||
-डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी
| ||
पत्रकारितेचे आदर्श ज्यांनी निर्माण केले त्यांचे स्मरण करण्यासाठी आपण पत्रकार दिन साजरा करतो. त्यांची पत्रकारिता समाज बांधणीच्या कामासाठी होती. ती समाजाचा आरसा होती. त्या आरश्यात समाजाचे प्रतिबिंब उमटायचे. आज या दर्पणात मात्र समाजाचे प्रतिबिंब दिसण्याऐवजी ती संपूर्णपणे प्रायोजित झाल्याची खंत करून आज जगात सर्वत्र 'राजकीय संवाद' हा इतर संवाद प्रकारांवर वरचढ झाला असून राजकारणीसुद्धा जाहिरातींचे ब्रान्डीग करू लागलेत,याकडे डॉ. जोशी यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. 'रोबोटिकजर्नालिझम' चा आधुिनक जगात झाला प्रवेश चीनमध्येएका रोबोटने तीन लाख लेख तयार केले. पत्रकारितेतील जिवंत माणसे यंत्र झाली असताना आता जगात 'रोबोटिक जर्नालिझम' चा प्रवेश झाला आहे. उद्या हे रोबोट यंत्र मानवी यंत्राची जागा घेतील आणि माध्यम सम्राटांना जे पाहिजे ते लिहून देतील. आतापर्यंतचे युद्ध हे माहितीचं युद्ध होतं आता यापुढे आशयाचं युद्ध राहील, याकडे डॉ. जोशी यांनी लक्ष वेधले. |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा