गिरधर पाटील यांची पोस्ट ………
समाजवादी गोतावळ्यात वावरणा-या नाना पाटेकरांनी आता शेतक-यांचा मसिहा होण्याचे ठरवलेले दिसते. काल एका वाहिनीवरच्या कार्यक्रमात आता पावसाचा राजा आला आहे तो पुढच्या वर्षी नक्कीच चांगला पाऊस आणणार आहे असे वदवून शेतक-यांच्या आशा पल्लवीत केल्या आहेत.
नानाचे या वातावरणातील प्रयत्न नक्कीच वाखाणण्याजोगे आहेत परंतु शेतक-यांचे प्रश्न ज्यातून निर्माण झाले त्या समाजवादी धोरणांचा तो परामर्ष घेणार की नाही ? शेतक-यांच्या प्रश्नांना कारूण्याची झालर लावून टाळ्या मिळवणे सोपे असते कारण आपल्या समाजाला ती समाजवादी सवय आपणच लावली आहे. शेतक-याला मदत करतांना उपकाराचा अहंकार डोकावू देण्यापेक्षा त्याच्या विहित हक्कांची भाषा आम्ही कधी करणार ?
उपजिविकेचे व सन्मानाने जगण्याचे हक्क तर घटनेनेच दिले आहेत, त्याबद्दल कधी बोलणार ? परंतु नानाच नव्हे तर अनेक कलाकार वा बुध्दीवादी बोलतांना एक डोळा सरकारकडे ठेवत, मी नाही बरंका त्यातला, अशी सावध भूमिका घेत असतात.
या सा-यांना एक प्रेमाचा सल्ला, तुम्हाला जर शेतीचे प्रश्न खरेच सोडवायचे असतील तर अगोदर ते समजून घ्या. त्यासाठी शेतकरी संघटनेने तयार केलेले अर्थवादी, वास्तववादी, व्यवहारवादी साहित्य डोळ्याखालून घाला. सर्वाच्या मुळाशी सरकार नावाची व्यवस्था असल्याचे दिसून येईल.
या नंतर ही शेतक-यांच्या प्रश्नांना हात लावण्याचे बळ उरले तर नक्कीच या, आम्ही तुमच्या बरोबर आहोत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा