शनिवार, २ एप्रिल, २०१६

 बक्षीसपत्राच्या दस्तास २०० रूपये नोंदणी शुल्क लागणार
 
शासन निर्णयानुसार जर निवासी आणि कृषि मालमत्ता पती, पत्नी, मुलगा, मुलगी, नातू, नात मृत पावलेल्या मुलाची पत्नी यांना बक्षीस दिली असेल, तर नोंदणी करण्यात येणाऱ्या बक्षीसपत्राच्या दस्तावर एक टक्केऐवजी केवळ २०० रूपये नोंदणी शुल्क आजपासून लागणार आहे. यापुढे उपरोक्त नातेसंबंधामध्ये बक्षीसपत्राचे दस्त नोंदणी करताना २०० रूपयांचा मुद्राक शुल्क त्याव्यतिरिक्त मिळकतीच्या बाजारमूल्यावर टक्के एवढा जिल्हा परिषद, नगर परिषद अधिभार लागेल. तरी नागरिकांनी शासनाने प्रदान केलेल्या सदर सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन बुलडाणा येथील मुद्रांक जिल्हाधिकारी नितीन पिंपळे यांनी केले आहे.
 


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा