३३ लाखापेक्षा कमी कमाई; ब्रिटन सोडावा लागणार ………
|
|
|
ब्रिटनमध्ये यापुढे सुमारे ३३ लाख रुपये वार्षिक कमाई नसलेल्यांना देश
सोडावा लागणार आहे. सरकारने व्हिसा नियमात बदल केला आहे. टियर-२ नियमांत हा
बदल करण्यात आला असून बुधवारपासून तो लागू झाला आहे. पहिल्या स्तरातील
व्हिसासाठी वार्षिक उत्पन्न किमान १९.७७ लाख रुपये असले पाहिजे. अनिवासी
व्यवहारविषयक मंत्री जेम्स ब्रोकनशायर म्हणाले, भारतीयांवर याचा अधिक
परिणाम होणार नाही. गेल्या वर्षी जारी करण्यात आलेल्या एकूण व्हिसांमध्ये
८९ टक्के भारतीयांचा समावेश आहे. ब्रिटनमध्ये काम करण्यासाठी अधिक योग्यता
असलेल्या लोकांना आकर्षित करणे हा नवीन नियमांचा उद्देश आहे. |
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा