गेल्या सत्तर वर्षांत पाकिस्तानसोबत चार युद्धे झाली. पण चार युद्धपट सुद्धा निर्माण झाले नाहीत. १९६५ साली भारतीय फौजांनी लाहोरला वेढा घातला होता, १९७१ मध्ये तर पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांगलादेशची निर्मिती केली, पाकिस्तानकडून लेखी शरणागती घेतली आणि ९३००० पाक सैनिक युद्धकैदी म्हणून ताब्यात घेतले. याएकाच युद्धावर डझनभर युद्धपट येऊ शकले असते. आता मात्र गेल्या बऱ्याच वर्षांपासून उल्लेखनीय असे युद्ध झाले नसूनही युद्धपटांची लाट आली आहे.याचे काय कारण असावे?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा