रविवार, १२ जुलै, २०२०

शॉर्टकट फायदेशीर नसतो. दुर्दैव दोनदा आड आले.
नजमा हेपतूल्ला 44 वर्षे कॉंग्रेसमध्ये होत्या.
24 वर्षे कॉंग्रेस खासदार होत्या.
त्यापैकी सोळा वर्षे राज्यसभेच्या उपसभापति होत्या.
मात्र 2004 मध्ये एनडीएच्या 'शाइनिँग इंडिया' आणि 'फील गुड' ला भाळल्या आणि भाजपत गेल्या. आणि त्यांना 10 वर्षांचा वनवास भोगावा लागला.
2004 मध्ये युपीएचे सरकार आले. 2014 मध्ये वनवास सम्पला. मंत्री झाल्या.
पण हाय रे दैवा!
वय आडवे आले. 75 च्या पुढे गेल्यामुळे मंत्रीमंडळातून बाहेर पडावे लागले.
कॉंग्रेसमध्येच राहिल्या असत्या तर कदाचित प्रतिभाताई ऐवजी त्या राष्ट्रपति झाल्या असत्या.

तात्पर्य शॉर्टकट फायदेशीर नसतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा