बुधवार, १० मार्च, २०२१

 कुठलाही सनसनाटी संदेश आला कि तो कुणाला पाठवू कुणाला नाही अशी मानवी प्रवुत्ती आहे. तुमच्या बाबतीतही तेच झाले आहे. आणि तुम्हाला ज्याने हा संदेश पाठवला त्याचेही असेच झाले असेल. आणि आपल्या अशाच मनोवृत्तीचा काही लबाड माणसे फायदा घेत असतात. आता या संदेशात फक्त "लग्न जुळवण्याचा नावाखाली काही माणसे उकळतात त्यांच्यापासून सावध रहा", एव्हढाच मजकूर असता तर तुमची व तुम्हाला असा संदेश पाठवणाऱ्याची सदभावना समजू शकलो असतो. पण यात काही फोन नंबर्सचा उल्लेख आहे. यात एक शक्यता अशी आहे की यातील सर्व किंवा काही नम्बर्स हे एखादी बोगस विवाह संस्था चालवणाऱ्या संचालकाच्या एजण्ट्स लोकांचे असू शकतात. हे सर्व नंबर जोपर्यंत हा संदेश व्हाट्सअपवर फिरत असेल तोपर्यंत काही दिवस बंद राहतील व नंतर आपले उद्योग सुरु करतील. मात्र आपल्या या संदेशlमुळे अशा बोगस संस्था संचालकांचा हे नंबर्स हजारो लोकांपर्यंत पोहोचविण्याचा मनसुबा यशस्वी झाला आहे. किंबहुना अशाच एखाद्या बोगस विवाह संस्थेने हा संदेश प्रसूत केला असावा जेणेकरून आपल्या एजण्ट्स लोकांचे नंबर सार्वजनिक व्हावेत. दुसरे असे की विवाह जुळविण्याचा व्यवसाय हा बेकायदेशीर नाही.  व यात आपली फसवणूक झाली हे सिद्ध करणे सोपे नाही. आपण शेअर केलेल्या बातम्यांमुळे लोक सावध होतील हि शक्यता कमी आहे. 

चंद्रावर स्वस्तात प्लॉट मिळतो म्हणून कुणी सांगत आलं की आपल्या तोंडाला पाणी सुटणारच. 

आपल्या संदेशात आपण काही फसवणुकीच्या बातम्या शेअर केल्या आहेत, त्या लग्न झाल्यानंतरच्या झालेल्या   फसवणुकीच्या आहेत. लन्ग जुळवतांना फसवणूक झाली हे सिद्ध करणे फार कठीण आहे. दुसरे असे की अशाप्रकारे काही लोकांची नावे व फोन नंबर्स जाहीर करणे हे मुळातच बेकायदेशीर आहे. व त्यासाठी हे लोकं आमची सोशल मीडियावर बदनामी केली म्हणून हा संदेश पाठविणाऱ्यांवर अब्रुनुकसानीचा खटला भरू शकतात.  पोलिसच अशी नlवे किंवा फोन नंबर्स जाहीर करू शकतात. फसवणूक झालेल्या व्यक्तीने जरी नाव/फोन नंबर जाहीर केले व उद्या ती व्यक्ती निर्दोष सुटली तरीही ती व्यक्ती अशा फोन नंबर जाहीर करणाऱ्या व्यक्तीवर अब्रुनुकसानीचा दावा करू शकते. याच संदेशात आपण बँकचे अकाउंट नंबरसुद्धा दिले आहेत. कुणाचेही बँक अकाऊंटची माहिती जगजाहीर करणे हा सुद्धा एक प्रकारचा गुन्हा आहे. 

या संदेशात रेशीमगाठी. जीवनसाथी सारख्या कायदेशीर व्यवहार करणाऱ्या मान्यवर विवाहसंस्थेची सुद्धा नावे आहेत तेंव्हा अशाप्रकारचे आपल्याला आलेले संदेश त्यांच्या सत्येतेची खातरजमा न करता पुढे पाठविणे हे सायबर कायद्याप्रमाणे गुन्हा आहे. यापूर्वी आपण अशाप्रकारचे काही मान्यवर व्यक्तींची बदनामी करणारे संदेश बिनदिक्कत फॉरवर्ड केलेले आहेत. अमुक एका थोर व्यक्तीचे एका अमुक व्यक्तीशी अनैतिक संबंध होते. अमुक एक मान्यवर व्यक्ती ती सांगते त्या धर्माची नसून ती दुसऱ्याच धर्माची आहे, वगैरे. आता सायबर कायदे कडक झाले आहेत. 'मी फक्त मला आलेला संदेश पुढे पाठवला", एव्हढे म्हणून जबाबदारी संपत नाही. संदेश पाठवणार व संदेश पाठवणार दोघांचीही जबाबदारी समान आहे. हा ग्रुप समाज प्रबोधनासाठी नाही हे वारंवार स्पष्ट करण्यात आलेले आहे. समाजप्रबोधनासाठी इतर अनेक ग्रुप आहेत. पण त्यावरही संदेश पाठवताना सायबर कायद्यांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. 

1 टिप्पणी: