रविवार, ९ मे, २०२१

परवा ७ मेला कवीवर्य गुरुदेव रविन्द्रनाथ ठाकूर यांची १६०वी जयंती साजरी करण्यात आली. भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांचे  राष्ट्रगीत ठाकुरांनी लिहिले आहे. भारत आणि बांग्लादेशमध्ये प्रत्येक सुशिक्षित हिंदू/मुस्लिम व्यक्तीच्या घरामध्ये रवींद्रनाथ ठाकूर व काझी नझरुल इस्लाम यांचे फोटो असतात.. मला नाही वाटत बंगाल व बांगलादेश सोडून भारतातील एखाद्या प्रांतातील लोकं आपल्या घरात कवी/विचारवंतांचा फोटो आपल्या घरात लावत असतील. बांग्लादेशमध्ये एकूण लोकसंख्येपैकी ९० टक्के लोक. मुस्लिम आहेत. पण अक्खा देश बंगाली भाषा बोलतो.  ठाकुरांनी आपल्या आयुष्याची बरीच वर्षे तेंव्हाच्या पूर्व बंगालमधील काही शहरांमध्ये  घालविली आहेत. तेंव्हा रस्ते मार्ग बरेच बिकट होते म्हणून ठाकूर तिकडे जलमार्गाने जात असत. त्यासाठी ते पद्मा नावाच्या बोटीचा वापर करत. त्या बोटीची प्रतिकृती बांगलादेशने भारताला भेट दिली आहे. बंगाली भाषा आल्याशिवाय बांगलादेशचे नागरिकत्व मिळत नाही. बंगाल प्रांताची पहिली फाळणी ब्रिटिशांनी १९०५ साली केली होती. हिंदू बहुलांचा पश्चिम बंगाल तर मुस्लिम बहुलांचा पूर्व बंगाल. मात्र हिंदू,मुस्लिम दोघांनीही या फाळणीचा कडाडून विरोध केला. ६ वर्षे वंगभंगाच्या तीव्र चळ्वळीनंतर अखेर १९११मध्ये ब्रटिटिशांना ही फाळणी रद्द करावी लागली. मात्र १७४७साली सगळ्यांचा नाईलाज झाला. पूर्व बंगालचा पूर्व पाकिस्तान झाला. पश्चिम बंगाल भारतात आला.  १९७१साली पूर्व पाकिस्तानने पश्चिम पाकिस्तानचे जोखड झुगारून दिले. पूर्व बंगालचा स्वतंत्र बंगलादेश झाला. २०११साली रवींद्रनाथांची दीडशेवी जयंती होती. ती भारत आणि बांगलादेश यांनी सयुंक्तपणे साजरी केली. त्याचा शुभारंभ ढाक्यात तीन दिवसांच्या कार्यक्रमात झाला. बंगलादेशामध्ये रवींद्रनाथ ठाकूर यांच्या नावाने विद्यापीठ आहे. तात्पर्य ज्या प्रांतात सर्व जातीधर्माचे लोकं एकच भाषा बोलतात त्यांच्यामध्ये फूट पाडणे अशक्य आहे. १९०५साली इंग्रजांनी बंगालमध्ये तो प्रयत्न करून पहिला आणि २०२१मध्ये..... एबीपी माझाला रामराम ठोकून आस्ट्रेलियाला गेलेलय हर्षदा स्वकुळ यांचा हा व्हिडीओ पाहण्याकरिता दिलेल्या ब्ल्यू लिंकवर क्लिक करा. 

बुधवार, १० मार्च, २०२१

 कुठलाही सनसनाटी संदेश आला कि तो कुणाला पाठवू कुणाला नाही अशी मानवी प्रवुत्ती आहे. तुमच्या बाबतीतही तेच झाले आहे. आणि तुम्हाला ज्याने हा संदेश पाठवला त्याचेही असेच झाले असेल. आणि आपल्या अशाच मनोवृत्तीचा काही लबाड माणसे फायदा घेत असतात. आता या संदेशात फक्त "लग्न जुळवण्याचा नावाखाली काही माणसे उकळतात त्यांच्यापासून सावध रहा", एव्हढाच मजकूर असता तर तुमची व तुम्हाला असा संदेश पाठवणाऱ्याची सदभावना समजू शकलो असतो. पण यात काही फोन नंबर्सचा उल्लेख आहे. यात एक शक्यता अशी आहे की यातील सर्व किंवा काही नम्बर्स हे एखादी बोगस विवाह संस्था चालवणाऱ्या संचालकाच्या एजण्ट्स लोकांचे असू शकतात. हे सर्व नंबर जोपर्यंत हा संदेश व्हाट्सअपवर फिरत असेल तोपर्यंत काही दिवस बंद राहतील व नंतर आपले उद्योग सुरु करतील. मात्र आपल्या या संदेशlमुळे अशा बोगस संस्था संचालकांचा हे नंबर्स हजारो लोकांपर्यंत पोहोचविण्याचा मनसुबा यशस्वी झाला आहे. किंबहुना अशाच एखाद्या बोगस विवाह संस्थेने हा संदेश प्रसूत केला असावा जेणेकरून आपल्या एजण्ट्स लोकांचे नंबर सार्वजनिक व्हावेत. दुसरे असे की विवाह जुळविण्याचा व्यवसाय हा बेकायदेशीर नाही.  व यात आपली फसवणूक झाली हे सिद्ध करणे सोपे नाही. आपण शेअर केलेल्या बातम्यांमुळे लोक सावध होतील हि शक्यता कमी आहे. 

चंद्रावर स्वस्तात प्लॉट मिळतो म्हणून कुणी सांगत आलं की आपल्या तोंडाला पाणी सुटणारच. 

आपल्या संदेशात आपण काही फसवणुकीच्या बातम्या शेअर केल्या आहेत, त्या लग्न झाल्यानंतरच्या झालेल्या   फसवणुकीच्या आहेत. लन्ग जुळवतांना फसवणूक झाली हे सिद्ध करणे फार कठीण आहे. दुसरे असे की अशाप्रकारे काही लोकांची नावे व फोन नंबर्स जाहीर करणे हे मुळातच बेकायदेशीर आहे. व त्यासाठी हे लोकं आमची सोशल मीडियावर बदनामी केली म्हणून हा संदेश पाठविणाऱ्यांवर अब्रुनुकसानीचा खटला भरू शकतात.  पोलिसच अशी नlवे किंवा फोन नंबर्स जाहीर करू शकतात. फसवणूक झालेल्या व्यक्तीने जरी नाव/फोन नंबर जाहीर केले व उद्या ती व्यक्ती निर्दोष सुटली तरीही ती व्यक्ती अशा फोन नंबर जाहीर करणाऱ्या व्यक्तीवर अब्रुनुकसानीचा दावा करू शकते. याच संदेशात आपण बँकचे अकाउंट नंबरसुद्धा दिले आहेत. कुणाचेही बँक अकाऊंटची माहिती जगजाहीर करणे हा सुद्धा एक प्रकारचा गुन्हा आहे. 

या संदेशात रेशीमगाठी. जीवनसाथी सारख्या कायदेशीर व्यवहार करणाऱ्या मान्यवर विवाहसंस्थेची सुद्धा नावे आहेत तेंव्हा अशाप्रकारचे आपल्याला आलेले संदेश त्यांच्या सत्येतेची खातरजमा न करता पुढे पाठविणे हे सायबर कायद्याप्रमाणे गुन्हा आहे. यापूर्वी आपण अशाप्रकारचे काही मान्यवर व्यक्तींची बदनामी करणारे संदेश बिनदिक्कत फॉरवर्ड केलेले आहेत. अमुक एका थोर व्यक्तीचे एका अमुक व्यक्तीशी अनैतिक संबंध होते. अमुक एक मान्यवर व्यक्ती ती सांगते त्या धर्माची नसून ती दुसऱ्याच धर्माची आहे, वगैरे. आता सायबर कायदे कडक झाले आहेत. 'मी फक्त मला आलेला संदेश पुढे पाठवला", एव्हढे म्हणून जबाबदारी संपत नाही. संदेश पाठवणार व संदेश पाठवणार दोघांचीही जबाबदारी समान आहे. हा ग्रुप समाज प्रबोधनासाठी नाही हे वारंवार स्पष्ट करण्यात आलेले आहे. समाजप्रबोधनासाठी इतर अनेक ग्रुप आहेत. पण त्यावरही संदेश पाठवताना सायबर कायद्यांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.