गुरुवार, २७ मार्च, २०१४

नमोने काढले वाड्याचे तेल वांग्यावर

आपल्या विरोधकांचा सफाया करायचा हे नमोंचे धोरण आहे. मेहसाणा दुध उत्पादक संघाचे विपुल शहा असेच नमोंच्या डोळ्यात सलत होते. मागील वर्षी मेहसाणा दुध संघाने मानवतेच्य दृष्टीकोणातून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना गुरे जागविण्याकरिता मदत म्हणून पशु खाद्य पाठविले होते. त्यानिमित्त  पुण्यात एक जंगी कार्यक्रम आयोजित केल्या गेला होता. त्यासाठी गुजरातमधील मान्यवर मंडळी आली होती. महाराष्ट्राला गुजरात मोठा भाऊ समजतो असे गुजरातमधील राजकारणी मंडळी म्हणत असतात. व महाराष्ट्राने वेळोवळी केलेल्या मदतीची जाण ठेऊन यावेळी गुजरातने महाराष्ट्राला मदत केली असेही बोलल्या जात होते.
मात्र विपुल शहाचा काटा काढण्यासाठी गुजरात सरकारच्या सहकार खात्याने महाराष्ट्राला केलेली ही मदत बेकायदेशीर ठरवून मेहसाणा दुध संघाला नोटीस बजावली आहे. व विपुल शहांना दुध संघाच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आले आहे. नाइलाजाने  मेहसाणा दुध संघाने महानंदला या मोफत पुरविल्या गेलेल्या पशुखाद्याचे २२ कोटी त्यांचेकडे भरण्याची नोटीस बजावली. मदत म्हणून दिल्या गेलेल्या वस्तूंचे पैसे मागण्याची बहुधा ही जगातील पहिलीच घटना असावी. आणि हे केवळ आपल्या  विरोधात जाणाऱ्या विपुल शहांना सहकार क्षेत्रातून हुसकाऊन लावण्याकरिताच सहकार खात्याचा असा दुरुपयोग नमोंनी चालविला आहे. तसेही नमोंना राज्यातील कुरियन यांनी उभे केलेले सहकार क्षेत्र मोडीत काढून कॉर्पोरेट क्षेत्राचे बस्तान बसावयाचे आहे, असे गुजरात मध्ये बोलले जात आहे. पण या वेळेस मात्र नमोंनी वड्याचे (म्हणजे विपुल शहांचे) तेल वांग्यावर (म्हणजे महाराष्ट्रावर) काढले आहे असेच म्हणावे लागेल व नमोंनी या प्रकरणात स्वतःचे हसेही करून घेतले आहे. 
राजेंद्र कडू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा