अटलबिहारी वाजपेयी यांचा राजनाथ यांना आशीर्वाद नाही
| |||
करूणा शुक्ला यांची माहिती, करूणा माजी पंतप्रधान वाजपेयींचे पुतणी
| |||
दिव्य मराठी नेटवर्क । लखनऊ
| |||
|
उत्तर प्रदेशच्या राजधानीतील निवडणूक लढाई आता अधिक रंजक बनली आहे.
भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांना धूळ चारण्यासाठी माजी पंतप्रधान अटल
बिहारी वाजपेयी यांची पुतणी करूणा शुक्ला समोर आल्या आहेत. करूणा प्रदीर्घकाळ भाजपमध्ये राहिल्यानंतर अलीकडे काँग्रेसमध्ये सहभागी झाल्या आहेत. दुसरीकडे शनिवारी राजनाथ सिंह काँग्रेसचे दिग्गज नेते नारायणदत्त तिवारी यांच्या घरी पोहचले. त्याचबरोबर त्यांचा आशिर्वाद देखील घेतला आहे. करूणा म्हणाल्या, अटलबिहारी वाजपेयी यांनी राजनाथ सिंह यांना आशिर्वाद दिलेला नाही. अटलबिहारी वाजपेयी यांची स्वप्ने पूर्ण करण्याचे काम काँग्रेस करत आहे. मी अटलबिहारी वाजपेयी यांच्या मोठय़ा भावाची मुलगी आहे. भाजपने आमच्या रक्ताचा अपमान केला आहे. केवळ अंगवस्त्र घेऊन वारसा मिळत नसतो. वाजपेयी यांची प्रकृती त्याची साक्ष देते. सध्या ते कुणाचे काही ऐकूही शकत नाहीत आणि बोलूही शकत नाहीत. भाजपाध्यक्ष वाजपेयींचा जुनाच फोटो वापरतात. राजनाथ आणि मोदी म्हणतात, ते वाजपेयींना भेटतात. परंतु वास्तवात सध्या वाजेपयी कोणालाही भेटत नसल्याचा दावा करूणा यांनी केला. ( दिव्य मराठी दि. २७/०४/१४) |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा