महाराष्ट्र एक्सप्रेस दिल्लीपर्यंत गेली पाहिजे.
रेल्वे बजेट आले. तामिळनाडू एक्सप्रेस चेन्नईहून दिल्लीला जाते. कर्नाटक एक्सप्रेस बंगलोरहून दिल्लीला जाते. केरळ एक्सप्रेस त्रिवेंद्रमहून दिल्लीला जाते. आंध्र एक्सप्रेस हैद्राबादहून दिल्लीला जाते. मग आमची महाराष्ट्र एक्सप्रेसच का ? महाराष्ट्रात घुटमळते. सध्या सुरु असलेली कोल्हापूर नागपूर द्वि-साप्ताहिक एक्सप्रेस (लातूर परभणी मार्गे जाणारी) ही गाडी दिल्लीपर्यंत वाढविल्यास नवी दिल्ली स्थानकावर " नई दिल्लीसे छत्रपती शाहू टर्मिनस (कोल्हापूर स्थानकाचे नाव ) जानेवाली महाराष्ट्र एक्सप्रेस प्ल्याटफॉर्म क्रमांक xx पर खडी है " अशी रोमांचकारक उद्घोषणा ऐकू येईल. तेंव्हा त्यासाठी महाराष्ट्रातील सर्व खासदार पक्षभेद विसरून एकजुटीने प्रयत्न करतील काय ? या गोष्टी पुरतेतरी आपण सर्व महाराष्ट्रवादी होऊ या. दिल्लीत महाराष्ट्र कुठे दिसत नाही असे म्हणतात कमीतकमी या बाबतीत तरी दिल्लीत महाराष्ट्र दिसू दे.राजेंद्र कडू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा