बुधवार, १ ऑक्टोबर, २०१४


निवडणुकीतील विजयापुढे नीतीमुल्ये बिन महत्वाची 'अ पार्टी विथ डिफरन्स' असे घोषवाक्य असणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा अगदी थोडाफार, उरलासुरलेला 'डिफरन्स'देखील जशी निवडणूक जवळ येत आहे तसतसा तो फारच वेगाने नष्ट होत आहे. कदाचित नुकत्याच मिळालेल्या वारेमाप विजयापुढे त्यांना आता नतिक मूल्ये व संस्कृती वगरे तद्दन भंपक गोष्टी वाटू लागल्या असाव्यात, म्हणूनच एरवी भ्रष्टाचारात अखंड बुडालेले लोक आता भाजपमध्ये येऊन पवित्र होत आहेत. पुढील काळात त्यांच्यावरील 'आरोप राजकीय हेतूने प्रेरित होते,' असेही शहाजोगपणे म्हणण्याचा काँग्रेसी कोडगेपणा यांनी अंगात पुरेपूर घेतला आहेच. आता अशा आयारामांमुळे सत्ता मिळालीही तरी त्यांच्या कारभारात व सध्याच्या काँग्रेसी कारभारात काय फरक असणार?
भाजप हा जर बाकीच्या राजकीय पक्षांप्रमाणे असता तर या बाजारूपणाची दखल घेण्याची गरज नव्हती; परंतु एरवी सगळ्या देशप्रेमाचा व देशभक्तीचा ठेका घेतलेले आम्हीच अशा रा. स्व. संघाचे हे अपत्य. त्यामुळे एरवी सल्लामसलत करणाऱ्या संघाच्या विशेष 'वैद्यांनी'देखील काही मात्रा या अपत्यास दिलेली ऐकिवात नाही. तसेच या पाठशाळेचे प्रमुख भागवताचार्य यांनाही कदाचित बदलत्या वाऱ्याप्रमाणे प्रामाणिकपणा व नतिक मूल्यांपेक्षा कोठल्याही मार्गाने का असेना, पण सत्ताच महत्त्वाची असे वाटू लागले असावे.
हृषीकेश वराडकर, नाशिक



 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा