शनिवार, ११ ऑक्टोबर, २०१४

हाथी चला बाजार बनाम बिक्रम और बेताल 

पाकिस्तानकडून होत असलेल्या तीव्र गोळीबार प्रकरणी अखेर मोदींनी तोंड उघडले व " बयानबाजी " करून हा प्रश्न सुटणार नाही तर आपले सैनिकच याची योग्य ती दाखल घेतील असे सांगून जनतेचे बारामती येथे प्रबोधन केले. हेच मोदी जेंव्हा मनमोहनसिंग कुठलीही "बयानबाजी'  न करता आपले शांतपणे काम करत होते तेंव्हा मात्र मोदी त्यांना गुंगा पीएम म्हणून त्यांची खिल्ली उडवत होते. लोकांनी डिवचल्या नंतर मोदींनी मात्र आपले तोंड उघडलेच. मनमोहनसिंग मात्र " हाथी चला बाजार …… " या म्हणीप्रमाणे संयम बाळगून आपले तोंड उघडले नाही व त्यांनी आपली जीभ विटाळून घेतली नाही. आणि निवृत्त होतांना " येणारा काळच माझ्या कामाचे मुल्यमापन करेन "असे म्हटले होते. विक्रम आणि वेताळ या कथेप्रमाणे वेळोवेळी विक्रमाने मौन न पाळता वेताळाच्या प्रश्नाचे उत्तर देण्याकरिता आपले तोंड उघडले व प्रत्येक वेळेस वेताळ विक्रमाच्या हातून निसटून झाडाला लोंबकळू लागला. विक्रमाने केलेली चूक मनमोहनसिंगांनी केली नाही. आत्ता सत्तेवर आलेल्या मोदींनी ही विक्रम आणि वेताळाची कथा अजून नीटपणे वाचलेली दिसत नाही. विरोधी पक्षाने वेताळ रुपी  जनतेमध्ये निर्माण केलेल्या क्षोभाला उत्तर देण्यासाठी का होईना मोदींना तोंड उघडावेच लागले. मनमोहनसिंगानी आपली शांतता ढळू दिली नाही व वेताळालाआपली हातातून निसटू दिले नाही. मनमोहनसिग हेच खरे विक्रमादित्य. मोदींच्या काळात मात्र वेताळ पुन्हा पुन्हा मोदींच्या हातून निसटणार व जनतेच्या मानगुटीस बसणार हे नक्की झाले .
राजेंद्र कडू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा