शनिवार, ३ जानेवारी, २०१५

 सगळ्यांचे पाय मातीचे असतात. टिळकांचेही असतीलच. आम्ही मात्र काही लोकांच्या विरोधात काहिही ऐकून घ्यायला मंडळी तयार नसतात. किंवा काही मंडळी अशी आहेत की त्यांच्यावर अजिबात टीका करता येत नाही. तर काही मंडळी मात्र सॉफ्ट टारगेट असतात. उदा, गांधीजी, नेहरू वगैरे. कुणीही यावे आणि टपली मारून जावे. सह्याद्री वाहिनीवरील लोकराजा शाहू महाराज या मालिकेत असा प्रसंग आहे की, कोल्हापूरचा एक ब्राम्हण शाहू महाराजांचा उल्लेख क्षुद्र म्हणून करतो तेंव्हा त्याला महाराज शिक्षा करतात. शाहू महाराजांच्या या कृतिबद्दल टिळक नापसंती व्यक्त करतात. यावरून टिळकांची मानसिकता दिसून येते. शिवाय कुणातरी संस्थानिकच्या दत्तक प्रकरणात (स्वातंत्र्य आंदोलनात नव्हे) टिळकांना कोर्ट  कारवाईला सामोरे जावे लागले होते असेही वाचण्यात आले होते. अभ्यासकांनी यावर खुलासा करावा.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा