मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०१५

बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाउले.

मोदी जितके कमी बोलतील व प्रसार माध्यमांपासून दूर राहतील तेव्हढे ते पंतप्रधानपदावर जास्त दिवस टिकून राहतील. अति प्रकाशझोतात राहिल्यामुळे यापूर्वी दोन पंतप्रधानांना पायउतार व्हावे लागले होते. एक म्हणजे राजीव गांधी (त्यांच्या ' हमे देखना हैं " ने त्यांचा घात केला) तर दुसरे अटल बिहारी वाजपेयी (त्यांच्या फील गुड व शायनिंग इंडिया च्या जाहिराती मुळे). जर मोदी कमीतकमी प्रकाशझोतात राहिले तर ते कमीत कमी पाच वर्षे तरी पदावर राहतील व त्यांच्या ' अच्छे दिन आयेंगे ' चा लोकांना विसर पडेल. (सध्या तसा पडत चाल लेला आहे). नाहीतर मोदी हे वर्ष तरी काढतील की नाही याबद्दल मी साशंक आहे. कारण संघ परिवार त्यांच्या सिंहासनाला सुरुंग लावण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवा ते प्रसिद्ध वचन " भय नही हमे दुष्टोकी दुर्जनतासे, भय हैं हमे स्वजनोकी निश्क्रीयतासे. मोदींना निष्क्रिय ठरवून हाकलले जाण्याचे बेत सुरु आहेत असे म्हणतात.
मनमोहनसिंगांनी पदावर आल्याआल्या, " कुठल्याही सरकारी कार्यालयात माझा फोटो लावू नये व मला कारण नसतांना दूरदर्शनवर प्रसिद्धी देऊ नये " असे फर्मान काढले होते. त्यामुळे की काय ते पुन्हा दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. कारण जेव्हढे जास्त बोलाल तेव्हढा उक्ती आणि कृती यात फरक पडत जातो. आणि हा फरक फारच धोकादायक असतो. कारण तुकारामांनी म्हटले आहे. " बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाउले." आणि जे नाही चाले त्यांनी चालते व्हावे असा अलिखित कायदाच आहे.
राजेंद्र कडू 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा