गुरुवार, १६ एप्रिल, २०१५

स्वातंत्र्य प्राप्तीनंतर काही वर्षे गांधीजी जिवंत असते तर नेहरूंना त्यांच्यावरही हेरगिरी करावी लागली असती. कारण सरकारला काही ' राजधर्म' पाळावे लागतात. गुजरात दंगलीनंतर वाजपेयींनी पंतप्रधान असतांना मोदींना जाहीर सभेत 'राजधर्म' पाळण्याचा म्हणजेच सरकारची आवश्यक ती कर्तव्ये पार पाडण्याचा सल्ला दिला होता. त्यावर मोदींनी ओशाळवाणे होऊन 'तेच तर मी करतोय ' असे पुटपुटत म्हटले होते. पण गुजरातमध्ये तेंव्हा सरकार अस्तित्वात असल्याची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा