मेहनत करे मुर्गा और अंडा खाये ……. बांगला देशाच्या निर्मितीत इंदिरांजींचा सिंहाचा आता होता. एव्हढेच नव्हे तर बांगला युद्धाच्या निमित्ताने पाकिस्ताचे नाक पुरते ठेचल्या गेले. लेखी शरणागती पत्करावी लागली. ९३,००० पाकिस्तानी सैनिकांना युद्धबंदी बनवून भारतात आणले गेले . ज्यांना १९४७ साली धर्माच्या आधारावर फाळणी हवी त्यांचीच १९७१ साली पुन्हा फाळणी झाली. इंदिराजींच्या या अजोड कामगिरीसाठी भारतीय जनतेने त्यांना " भारत रत्न " म्हणून गौरविले. परवा मात्र नवलच घडले. १९७१ साली विरोधी पक्षात असलेले वाजपेयी यांनी बांगला स्वातंत्र्य आंदोलनाला पाठीम्बा दिल्याबद्दल बांगला देशचा सर्वोच्च पुरस्कार दिल्या गेला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा