भाष्करराव, तुमचे आभारी आहोत
सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता श्री. भाष्करराव अरबट यांनी लिहिलेल्या " अखेरचा निरोप " या पुस्तकाचे काल प्रकाशन झाले. त्यांनी लिहिलेले हे पाचवे पुस्तक आहे. विशेष म्हणजे त्यांनी निवृत्तीनंतर लिखाणाला सुरुवात केली. आणखी एक विशेष म्हणजे या पुस्तकाची अर्पण पत्रिका. हे पुस्तक त्यांनी आपल्या तिन्ही सुनांना समर्पित केले आहे. आणि अर्पण पत्रिकेत सुनांचा उल्लेख त्यांनी चक्क 'सेकंड मदर' (दुसरी आई) असा केला आहे. त्याबद्दल त्यांनी असा खुलासा केला की पत्नीच्या निधनानंतर तिन्ही सुनांनी त्यांची काळजी आईच्या मायेने घेतली. त्या त्यांच्या आईच झाल्या. सून म्हणजे मुलगीच असा आदर्श विचार आपल्याला नेहमी ऐकायला मिळतो. पण सुनेला चक्क आईचा दर्जा देणारी भाष्करराव ही पहिलीच व्यक्ती असावी आणि अर्पण पत्रिकेत त्यांनी तसा उल्लेख करून मातृऋणही फेडले आहे. सुनांसाठी 'दुसरी आई' (सेकंड मदर) हा सुंदर शब्द दिल्याबद्दल भास्करराव, आम्ही तुमचे आभारी आहोत. २४ ऑगस्ट रोजी भास्कररावांचा वाढदिवस आहे. त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा.राजेंद्र कडू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा