शनिवार, १९ सप्टेंबर, २०१५

सध्या सर्वत्र १९६५ च्या युद्धाच्या संस्मरणाचे कार्यक्रम सुरु आहेत. आणि काल परवापर्यंत जी मंडळी म्हणत होती की "साठ सालमे कुछ नही हुआ" ती मंडळी अहमिकेने पुढे पुढे करत आहे. १९६५ च्या युद्धाचा उदोउदो करण्यात सत्तारूढ पक्षाला काहीही धोका नाही कारण तेंव्हा गांधी/नेहरू घराण्यातील कुणीही व्यक्ती पंतप्रधानपदी नव्हती. १९७१ चे बांगला युद्ध मात्र झाकून/ लपवून ठेवावे लागेल कारण तेंव्हा (१९७१ साली) अशी व्यक्ती पंतप्रधानपदावर होती जीचा नामोल्लेख तेंव्हाचे विरोधी पक्ष नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी साक्षात "दुर्गा" असा केला होता. पुढे पत्रकारांनी त्या व्यक्तीला " याह्यासुर मर्दिनी" असाही खिताब बहाल केला होता. कारण त्या व्यक्तीने पाकिस्तानचा निर्णायक पराभव करून लेखी शरणागती घेतली होती. तेंव्हा पाकिस्तानात लष्करी हुकुमशहा याह्याखान हा सत्तेवर होता. (म्हणून याह्यासुर मर्दिनी).  या पंधरा दिवसाच्या युद्धात युद्धबंदी म्हणून पकडल्या गेलेल्या सैनिकाची संख्या होती ९३,०००. हा जागतिक विक्रम आहे. आणि हो एकाच घराण्याच्या व्यक्तींचा किती उदो उदो करायचा म्हणून परवाच त्यांच्या नावाचे टपाल तिकीट रद्द करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा