अरे देवा, पानसरे हत्याकांडाचा तपासातही एन आय ए. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आधीच्या सरकारी वकील रोहिणी सालियन यांनी " एन आय ए ने आपल्याला आरोपींशी (साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित वगैरे) नरमाईने घेण्याची सूचना केली होती " असे सांगून राष्ट्रीय तपास संस्थेची लक्तरे वेशीवर टांगली होती. आणि आता पानसरे हत्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी एन आय ए चे पथक कोल्हापुरात दाखल झाल्याची बातमी दिव्य मराठीमध्ये वाचली. एकूण आता सरकारचा सर्वात जास्त आवडता पोपट कोण याच्यासाठी सीबीआय व एन आय ए मध्ये चुरस निर्माण होणार असे दिसते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा