रविवार, २० सप्टेंबर, २०१५

उर्दू ही मुसलमानांची भाषा नाही.  

आणि इंग्रजी ख्रिश्चनांची भाषा नाही. जगातील  देशातील एकूण मुस्लिम देशातील फक्त भारत व पाकिस्तानातच उर्दू बोलली जाते. आपल्या शेजारचा बांगला देश हा मुस्लिम देश आहे पण तेथे उर्दू बोलणारयांची संख्या नगण्य आहे. तेथील कारभार बांगला भाषेत चालतो. रवीन्द्रनाथ ठाकूर यांची १५० वी जयंती बांगला देशात दणक्यात साजरी झाली. तसा भव्य कार्यक्रम भारतातही झाला नसेल असे मला वाटते. पाकिस्तानातही उर्दू फार कमी बोलली जाते अशी माझी माहिती आहे. तेथील पंजाब प्रांतातील उर्दूवर पंजाबी भाषेचा प्रभाव आहे. सिंध प्रांतात सिंधीचा तर काही भागात पख्तून व अन्य भाषा बोलल्या जातात. पाकिस्तान हा कट्टर मुसलमानांचा देश आपण समजतो पण तेथे ही चातुर्वण आहे. ज्याप्रमाणे हिटलर स्वत:ला शुद्ध आर्य वंशाचा म्हणवून घ्यायचा व इतर नागरिक हे जर्मनीचे दुय्यम नागरिक आहेत असे मानायचा तसेच पाकीस्तानील पंजाबी मुसलमान स्वत:ला विशेष समजतात. तेथे पंजाबी मुसलमानांचे वर्चस्व आहे. त्यामुळे पूर्व पाकीस्तानील (आताचा बांगला देश) मुजिबुर्रहमान यांना पाकिस्तानी संसदेत बहुमत मिळूनही, एक बंगाली मुसलमान देशाचा पंतप्रधान होईल हे पंजाबी मुसलमानांना सहन झाले नाही. शेवटी पूर्व पाकिस्तानात आंदोलन सुरु होऊन १९७१ चे बांगला युद्ध घडून आले व पाकिस्तानची फाळणी झाली. भारताला यात नाइलाजाने पुढाकार घ्यावा लागला कारण दररोज हजारो बांगला निर्वासित भारतात येत होते. १९७१ चे बांगला युद्ध म्हणजे 'जय नावाचा इतिहास'  आहे. येथे धर्मापेक्षाही भाषा हा घटक प्रभावी ठरला. 
जगात बरेच देश खिश्चन आहेत पण ते सर्व इंग्रजी बोलणारे नाहीत. किंबहुना जगातील २०० हून जास्त देशांपैकी इंग्रजी बोलणारे देश हाताच्या बोटावर मोजावे इतकेच असतील. युरोपमधील अनेक देश इंग्रजी मुळीच बोलत नाहीत. दक्षिण भारतातील काही प्रांतांनी ज्याप्रमाणे हिंदीला खड्यासारखे दूर ठेवले आहे, तसेच बऱ्याच युरोपिअन देशांतील लोक इंग्रजीला झुरळासारखे झटकून टाकतात. अमेरिकेत सुद्धा आता spanish भाषेला दुसऱ्या bhaash भाषेचा (सेकंड lannguage चा दर्जा मिळावा अशी मागणी होत आहे. तेथे सार्वजनिक ठिकाणी असलेल्या सर्व सूचना ह्या इंग्रजी व spanish मध्ये असतात. जे देश इंग्रजांचे गुलाम होते तेथील मंडळी इंग्रजीला कवटाळून आहेत. ज्याप्रमाणे एखादा नोकर अभिमानाने सांगतो की " मेरे सेठके पास पांच गाडिया हैं" तसे गुलाम देशातील लोकांचे झाले आहे. काही युरोपिअन देशात तुम्ही इंग्रजीत बोललात तर त्यांना इंग्रजी समजत असूनही ते म्हणतील, 'sorry, no Eglish please.' काही युरोपीय देशांमध्ये इंग्रजी ही विमानतळावर होणाऱ्या उद्घोषणापुरती मर्यादित आहे. विमानतळाबाहेर पडलो की तुमच्या दुर्दैवाचे दशावतार सुरु होतात. तेंव्हा कुठल्याही भाषेला एखाद्या धर्माशी जोडता येणार नाही. विकीपेडिया वर पाकिस्तानात बोलल्या जाणाऱ्या भाषांबद्दल मिळालेली माहिती अशी - Regional languages Punjabi, Pashto, Sindhi, Saraiki, Balochi, Kashmiri, Brahui, Hindko, Shina, Balti, Khowar, Burushaski Yidgha, Dameli, Kalasha, Gawar-Bati, Domaaki[8][9]

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा