रविवार, २० सप्टेंबर, २०१५

आग लगी हमरी झोपडीयामे, हम गावे मल्हार. दिलीपकुमार यांच्या 'सगीना' या चित्रपटातील हे गाजलेले गाणे मला आज प्रकर्षाने आठवले. गुजरात मध्ये पटेलांचे आंदोलन सुरु आहे. बँकांमधून आपल्या ठेवी काढून घ्यायचे आंदोलन पण आता त्यांनी सुरु केले आहे. गुजरात, भारत व विदेशात असलेल्या पाटीदारांची संख्या मोठी आहे. व ते राज्याच्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव पाडू शकतात. अमेरिकेत ज्यू लॉबी प्रभावी आहे व त्यांना डावलून अमेरिकी  प्रशासन कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही, गुजरातवर आरबीआय ने घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त कर्ज आहे असे सर्व सेवा संघाचे अध्यक्ष महादेव भाई म्हणतात . गुजरात राज्या बद्दल येणारे निरनिराळे आर्थिक अहवाल राज्याची प्रकृती ठीक नाही असे सांगतात. मोदी मुख्यमंत्री असतांनाच गुजराथच्या अर्थव्यवस्थेचा क्रमांक ओरिसाच्याही मागे असल्याचा अहवाल तेंव्हा प्रसिद्ध झाला होता. या पार्श्वभूमीवर आज एका मराठी दैनिकात "Gujrat best for doing business" अशी अर्धा पान जाहिरात पाहायला मिळाली व मला हे गाणे आठवले. " आग लगी हमरी झोपडीयामे, हम गावे मल्हार ". 








 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा